राय नगर कन्हान येथे महारानी दुर्गावती मंडावी चा जन्म दिवस थाटात साजरा
#) गोंडवाना ची महारानी दुर्गावती मडावी.
कन्हान : – गड मंडला गोंडवाना ची महारानी दुर्गावती मडावी यांचा ४९७ वा जन्म दिवस गोंगपा व्दारे राय नगर कन्हान येथे थाटात साजरा करण्यात आला.
आम्हच्या मातृशक्तीची सेवा जोहार मातृशक्ती ही महाराणी दुर्गावतीजी प्रमा़णे शक्ती आहे. त्यानी सामोर येऊन समाजावर होण्या-या अन्याय, अत्याचार विरूध्द लढायला पाहीजे, मातृशक्ती ही आपल्या मुलाना सामो र वाढवु शकते. त्यांच्यात चेतना, जागरूकता करू शकते. मातृशक्ती मध्ये मोठी शक्ती आहे. फक्त सामोर येऊन महाराणी दुर्गावती जशी लढली पाहीजे. राणी दुर्गावतीजीने जे समाजाकरिता महान कार्य केले. ते हर एक मातृशक्ती मध्य करण्याची ईच्छा शक्ती असली पाहीजे. महारानी दुर्गावती ही आमच्या गोंड समाजाची असल्याचा आम्हला गर्व असला पाहीजे. महाराणी दुर्गावतीजी चा ४९७ वा जन्म दिवस ०५ ऑक्टोबर ला राय नगर कन्हान येथे गोंगपा महाराष्ट्र उपाध्यक्ष तिरु सुखलाल मडावी यांच्या प्रमुख उपस्थित हर्षोउल्लासा त साजरा करण्यात आला. यावेळी तिरु सुखलाल मडावीजी ने समाज बांधवाना एकसंघ करण्याकरिता मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता तिरु सोनु मसराम, कन्हान शहर अध्यक्ष गोंगपा रजनीश मेश्राम, संदीप परतें, शंकर इनवाते, गगन सिरसाम, रवि परतें, स्वागलाल इनवाते, सोनु नागवंशी, संतोष मरकाम, रामलाल पट्टा, तिरुमाय रत्नाबाई मंडावी, प्रमिला मंडावी, केशरबाई सिरसाम, सुशिला इनवाते आदीने सहकार्य केले.