शिक्षकांचे वेतनास पुन्हा  विलंब , शिक्षकांना मनस्ताप

*शिक्षकांचे वेतनास पुन्हा  विलंब

    *जि.प.प्रशासनाच्या लेटलतीफ कारभारामुळे शिक्षकांना मनस्ताप*

कन्हान : शिक्षकांचे वेतन दरमहा 1 तारखेला करण्याबाबत शासनाने वेळोवेळी शासन निर्णय व परिपत्रके काढले असून याची तसदी नागपूर जिल्हा परिषदेने घेतलेली दिसत नाही.प्रशासनाच्या चालढकलपणामुळे शिक्षकांना कधीच वेळेवर वेतन मिळत नाही.वेतनास विलंब ही बाब आता नित्याचीच झाली असल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने केला.

     लेटलतीफ पगाराचा फटका शिक्षकांना बसत असून,अनेक शिक्षकांचे आर्थिक बजेट कोलमडले जाते,अनेक शिक्षकांनी घेतलेल्या हाऊसींग लोन व इतर कर्जाचे हप्ते यामुळे वेळेवर भरल्या जात नाही व अतिरिक्त व्याजाचा भूर्दंड शिक्षकांवर बसतो.मुलांच्या शिक्षणाचे फीस व इतर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. 

  वेळेवर वेतन होण्यासाठी वेतनासाठी सीएमपी प्रणाली लागू करून शासन निर्णयानुसार शिक्षकांना वेळेवर वेतन देण्याची मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे शिक्षक नेते गोपालराव चरडे ,रामू गोतमारे, सुनिल पेटकर,सुभाष गायधने,ज्ञानेश्वर वंजारी,धनराज बोडे,आनंद गिरडकर,गजेंद्र कोल्हे,अशोक बावनकुळे, विरेंद्र वाघमारे,प्रकाश बांबल,पंजाब राठोड,लोकेश सुर्यवंशी, दिलीप जिभकाटे,अशोक डोंगरे ,उज्वल रोकडे, संजय शिंगारे ,विजय बिडवाईक,अनिल दलाल,जागेश्वर कावळे,आशा झिल्पे ,सिंधू टिपरे,वंदना डेकाटे,पुंड,नंदा गिरडकर आदींनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

संत जगनाडे महाराज जंयती समारोह साजरा 

Tue Dec 8 , 2020
संत जगनाडे महाराज जंयती समारोह साजरा  कन्हान – भाजपा कन्हान शहराचा वतीने संत श्री जगनाडे महाराज यांच्या जयंती  कार्यक्रमाचे आयोजन दि.8 डीसेंबर रोजी मंगळवारला संताजी मंगल कार्यालय येथील मंदीरात पार पाडला . याप्रसंगी शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यानी संत जगनाडे महाराज , संत तुकाराम महाराज आणी विठ्ठल रुक्कमाई यांचा […]

You May Like

Archives

Categories

Meta