कल्याणी सरोदे ला राज्यस्तरीय युथ आयडल कलारत्न गौरव पुरस्कार

*कल्याणी सरोदे ला राज्यस्तरीय युथ आयडल कलारत्न गौरव पुरस्कार २०२१
*कल्याणी सरोदे गुणिजन गौरव पुरस्कार प्रदान

कन्हान-कांन्द्री रहिवाशी कल्याणी सरोदे यांना राज्यस्तरीय पुरस्कार युथ आयडल कलारत्न गौरव पुरस्कार 2021 सन्मानित करण्यात आले. बेस्ट मेकअप आर्टिस्ट युथ इतक्या कमी वयामध्ये त्यांनी इंटरनॅशनल अवॉर्ड व नॅशनल अवॉर्ड पारितोषिक मध्ये प्रथम क्रमांक पटकावता आले. त्यामुळे त्यांना राज्यस्तरीय युथ आयडल गौरव पुरस्कार मानकरी म्हणून सन्मानित करण्यात आले.


बुधवार (दि.२९) डिसेंबर २०२१ रोजी मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (रजि. ट्रस्ट) संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गुणिजन गौरव महापरिषद आणि पुरस्कार वितरण सोहळा मुंबई शहरातील सोशल सभागृहात दादर येथे थाटात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील २५ क्षेत्रांतून पुरस्कारासाठी निवडलेल्या २५ मानकऱ्यांना या सोहळ्यात मानाचा फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र, गौरवपदक, सन्मानचिन्ह आणि मानपत्र या स्वरूपात राज्यस्तरीय पुरस्कार थाटात प्रदान करण्यात आले. सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ. प.श्री.श्यामसुंदर महाराज सोन्नर हे सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून केलेल्या बीजभाषणात त्यांनी पुरस्कार मानकरी गुणवंतांनी भारतीय संविधानाला अपेक्षित अशी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हि मूल्ये समाजात खोलवर रुजविण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्याचे आवाहन केले. सुप्रसिध्द साहित्यिक रमेश आव्हाड हे या समारंभाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि इंटरनॅशनल एज्युकेशन आयकॉन सौ.हेमाली जोशी या विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. समारंभाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध प्रेरक वक्त्या सौ.मनिषा कदम यांनी केले. गुणिजन परिवाराचे पदाधिकारी प्रकाश सावंत, लक्ष्मणराव दाते, अमोलराव सुपेकर आदींसह याप्रसंगी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

भाजपा पारशिवनी तालुका व कन्हान शहर वतीने पत्रकार दिवस साजरा ; ग्रामौन्नती प्रतिष्ठाण कन्हान व्दारे बाळशास्त्री जयंती थाटात साजरी

Sun Jan 9 , 2022
*भाजपा पारशिवनी तालुका व कन्हान शहर वतीने पत्रकार दिवस साजरा *ग्रामौन्नती प्रतिष्ठाण कन्हान व्दारे बाळशास्त्री जयंती थाटात साजरी तारसा रोड कन्हान येथील भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री श्री रामभाऊ दिवटे यांच्या बंगल्याच्या आवारात पारशिवनी तालुका व भाजपा कन्हान शहर च्या संयुक्त विद्यमाने दर्पणकार आचार्य बाळ शास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त […]

Archives

Categories

Meta