केरडी बस स्टाप जवळ इनोवा वाहनाची दुचाकीला धडकेत युवकाचा मृत्यु

केरडी बस स्टाप जवळ इनोवा वाहनाची दुचाकीला धडकेत युवका चा मृत्यु

#) कन्हान पोलीस स्टेशन ला इनोवा वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल.

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस ७ कि मी अंतरावर असलेल्या केरडी बस स्टाप जवळ इनोवा चारचाकी वाहन चालकाने खंडाळा डुमरी वरून कांद्री कडे जाणाऱ्या दुचाकी ला मागुन जोरदार धडक मार ल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वाहन चालक शेखर ठाकरे या युवकांचा मृत्यु झाल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला फिर्यादी च्या तक्रारीवरून इनोवा वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.


प्राप्त माहिती नुसार मंगळवार (दि.८) फेब्रुवारी २०२२ ला सकाळी ७ ते ७:३० वाजता दरम्यान ताराचंद पंजाबराव ठाकरे वय ३६ वर्ष राह. खंडाळा (डुमरी ) यांचा लहान भाऊ मृतक शेखर सुर्यभान ठाकरे वय ३४ वर्ष राह. खंडाळा (डुमरी) हा आपल्या दुचाकी वाहन क्र. एम एच ४० टी २७१५ ने खंडाळा (डुमरी) वरून कांद्री येथे जात असतांना केरडी फाट्या बस स्टाप जवळ मागुन येणारी इनोवा चारचारी वाहन क्र. एपी ०९ बीयु ८०५५ च्या चालकाने आपले ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजी पणाने चालवुन दुचाकी वाहना ला मागुन जोरदार धडक मारल्याने दुचाकी वाहन चालक शेखर ठाकरे हा खाली पडल्याने रस्त्याचा जबर मार लागुन रक्त स्त्राव झाल्याने उपचाराकरिता रुग्णालयात नेत असतांना रस्त्यातच मरण पावला व रुग्णालयात नेले असता डाॅक्टरांनी मृत घोषित केले. सदर प्रकरणात कन्हान पोलीसांनी फिर्यादी ताराचंद पंजाबराव ठाकरे यांच्या तोंडी तक्रारी वरून आरोपी इनोवा चारचाकी वाहन चालका विरुद्ध कलम २७९, ३०४ (अ) भादंवि, १८५ मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

इंदर कोळसा खदान चा चोरी केलेला कोळसा पकडुन आरोपी विरूध्द गुन्हा दाखल

Wed Feb 9 , 2022
इंदर कोळसा खदान चा चोरी केलेला कोळसा पकडुन आरोपी विरूध्द गुन्हा दाखल #) वराडा येथील शेतातील चोरीचा कोळसा पकडुन ३२,००० रुपयाचा मुद्देमाल जप्त. कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस ६ कि मी अंतरावर असलेल्या वराडा शिवारात राहुल सिंग यांच्या शेतात भुजंग महल्ले यांनी इंदर खुली कोळसा खदान येथील कोळसा […]

You May Like

Archives

Categories

Meta