ऐतिहासिक स्थळाना भेट, संस्कृतीचे संवर्धनास लातुर च्या संतोष बलगिर ची सायकलने भ्रमती

ऐतिहासिक स्थळाना भेट, संस्कृतीचे संवर्धनास लातुर च्या संतोष बलगिर ची सायकलने भ्रमती

#) माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यांनी संतोष बलगिर चे केले स्वागत. 


कन्हान : – महाराष्ट्रातील लातुर येथील युवा संतोष बलगिर हा आपल्या राज्यातील व देशातील ऐतिहासिक धरोहर असलेल्या स्थळाना भेट देऊन माहीती चा अभ्यास करून ऐतिहासिक वास्तु, स्थळे, संस्कृती ही जोपासुन संवर्धन व्हावे याकरिता जनजागृती पर लातुर येथुन सायकलने भ्रमती करणा-या संतोष बलगिर यांचा कन्हान येथे ग्रामोन्नती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष, माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव हयांनी स्वागत करून पुढच्या प्रवासास शुभेच्छा दिल्या.  

        रविवार २० डिसेंबर २०२० ला महाराष्ट्रातील लातुर जिल्हयातील संतोष बलगीर हा युवक राज्य, देृशातील ऐतिहासिक स्थळे, वास्तु, गडकिल्ले हयाना भेट देऊन भारतीय संस्कृतीचे संरक्षण करून संवर्धन व्हावे याकरिता ११ हजार किमी १५ राज्याचा सायक लने प्रवास करून अभ्यास करित ऐतिहासिक स्थळे, धरोहर यांचे संरक्षण होऊन पर्यटन स्थळे म्हणुन विकास करून त्याचे संरक्षण, संवर्धन करून भारतीय या प्राचिन ऐतिहासिक, सांस्कृती धरोहरांची जोपासणा होण्याच्या सार्थ हेतुने सायकल प्रवास करित जनजागृती करित आहे. लातुर येथुन प्रवास सुरू करून दक्षिण भारतातील कनाटक, केरळ, आध्रा, तामिलनाडु, तेलंगना आदीचा प्रवास करित नागपुर शहराला भेट देऊन रामटेक मार्गे मध्यप्रदेश कडे जात असताना पायाच्या दुखण्याकरिता औषध कन्हान येथिल मेडीकल दुकानात घेताना ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान प्रतिनीधी निलेश गाढवे व केतन भिवगडे हयाची भेट होऊन त्यांनी ग्रामोन्नती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष व माजी खासदार प्रकाशभाऊ जाधव हयाच्या घरी नेले असता संतोष बलगिर चे स्वागत करून सोबत जेवण केल्यावर नागपुर येथिल गोंड राजे बख्तबुलंद शाह, महाल नागपुर चे रघुजी राजे भोसले, दिक्षाभुमी, नगरधन किल्ला, रामटेक गडमंदीर, नारायण टेकडी, मनसर येथे उत्खनन करून प्राचिन संस्कृती आदी ऐतिहासिक चर्चा करून सौ कल्पनाताई प्रकाश जाधव हयानी अक्षवंत करून पुढच्या भ्रमणाकरिता संतोष बलगिर ला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शिवसेना उत्तर नागपुर माजी उपजिल्हा प्रमुख किशोर ठाकरे, ग्रामोन्नती चे मोतीराम रहाटे, दिलीप राईकवार, प्रतिक जाधव, निलेश गाढवे, केतन भिवगडे, निशांत जाधव प्रामुख्याने उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान पोलीस स्टेशन द्वारे जागतिक महिला दिवस कार्यक्रम थाटात साजरा

Tue Mar 9 , 2021
*कन्हान पोलीस स्टेशन द्वारे जागतिक महिला दिवस कार्यक्रम थाटात साजरा*   कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन द्वारे जागतिक महिला दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन हनुमान मंदिर परिसर गांधी चौक येथे करुन सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेवर हार माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन करीत सर्व महिलांना पुष्प गुच्छ देऊन स्वागत करुन जागतिक महिला दिवस […]

You May Like

Archives

Categories

Meta