तेजस बहुउद्देशीय संस्था कामठी व्दारे आजनी येथील गरजुंना धान्याचे वितरण 

तेजस बहुउद्देशीय संस्था कामठी व्दारे आजनी येथील गरजुंना धान्याचे वितरण 

#) ” भुकेलेल्यास एक मुठ अन्न, धान्य आपल्या व्दारे ” सेवाभावी उपक्रमाची सुरूवात. 


 कन्हान : –  तेजस बहुउद्देशीय संस्था व प्रशिक्षण कामठी व्दारे गरजु गरिब, बेसहारा, वयोवृध्द, विधवा महिला अश्या लोकांवर उपासमारीची पाळी येऊ नये म्हणुन ” ़भुकेल्यास एक मुठ अन्य, धान्य आपल्या व्दारे ” या सेवाभावी उपक्रमाची सुरूवात करून छोटी आजनी येथील गरजु १५ परिवारांना तांदुळ १५ किलो, गहु १० किलो अन्न, धान्य वितरण करून करण्यात आली. 

        कामठी च्या दाला ओली येथील दोन बहिनी खायला काही नसल्या ने उपासी पोटी असल्याने घरीच भुकेने व्याकुळ होऊन दि. ७ जानेवारी २०२१ ला मरण पावल्याचे दुदैवी, मन सुन्न करणा-या घटनेची दखल घेत तेजस बहुउद्देशीय संस्था कामठी व तेजस प्रशिक्षण संस्थे व्दारे दि २६ जानेवारी २०२१ ला साई मंदिर आड़ा पुल कामठी- कन्हान येथे “भुकेल्यास एक मुठ अन्न आपल्या द्वारे ” या उपक्रमाचा शुभारंभ मान्य वरांच्या उपस़्थित करून श्री चंद्रशेखर अरगुलेवार यांच्या पत्नी सौ इंदिरा अरगुलेवार यांनी तयार केलेल्या शंभर थैयले इछुक महानुभवाना देऊन रोज एक मुठ अन्न ३० दिवस थैयलीत जमा करून महिन्याच्या ०१ तारखे ला धान्य भरलेली थैली संस्था कडे जमा करण्यास सांगितले. दि. ०५ मार्च ला माहानुभवा द्वारे थैली भरून जमा केलेले अन्न, धान्य जुनीकामठी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक विजय मलाचे, समाजसेवक माजी उपाध्यक्ष तेजस संस्थेचे वरिष्ठ मार्गदर्शक महेंद्र भुटानी, जामुवंतराव धोटे विचार मंच अध्यक्ष सुनील चोखारे, प्राध्यापक कपूर कनोजिया यांच्या प्रमुख उपस्थितीत कन्हान-कामठी क्षेत्राकील छोटी आजनी गाँवातील बेसहारा, गरीब मजुर, वयोवृध्द, विधवा महिला अश्या १२ परिवाराना १५ किलो तांदुळ, १० किलो गहु अन्न धान्य वितरण करण्यात आले. संस्थेचे संस्थापक चन्द्रशेखर अरगुलेवार यांनी याप्रसंगी म्हटले की, जेव्हा पर्यंत माझे जीवन आहे तोपर्यंत हा सेवाभावी उपक्रम सुरू राहील. जेणे करून कामठी तील दि. ७ जानेवारी २०२१ ला घडलेली दुदैवी घटना दुस-यांदा होऊ नये म्हणुन हा सेवाभावी उपक्रम राबविण्यात येईल. या उपक्रमाच्या यशस्विते करिता तेजस बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर अरगुलेवार, उपाध्यक्ष देवीदास पेटारे, मार्गदर्शक विनोद कास्त्री, रहीम शेख, सदस्य मिस्बाहऊर रहमान, जयराज कोंडुलवार, विजय कोंडुलवार, रोशन श्रिरसागर, अजय अखारिय, सफिक रहमान, नरेश शिंदे, सेवक शिंदे, इंडिया फेक्ट न्यूज़ पोर्टल चीफ एडिटर नावेद आजमी, किर्ती पत्रले, भारती कनोजे व तेजस संस्थेच्या युवक, युवती परिश्रम करित आहेत.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय नवेगाव खैरी येथे कोरोना चा उद्रेक : विद्यालयात केली तपासणी व उपचार

Wed Mar 10 , 2021
*केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय नवेगाव खैरी येथे कोरोना चा उद्रेक* #) *१७५लोकांची चाचणीत १७ विद्यार्थी, ७ कर्मचारी व त्यांचे परिवार निघाले कोरोना बाधित*. #)*प्राथामिक आरोग्य केन्द नवेगाव खैरी चे डाक्टर व टीम ने नवोदय विद्यालयात केली तपासणी व उपचार*. #) *पालकांच्या शाळा प्रशासन वर रोष*. कमलसिहं यादव पारशिवनी तालुका प्रतिनिधी […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta