स्थानिक पोलिसांची सूर्या लाजवर धाड.*
*संशयास्पद 6 जोडपे कडक चौकशीनंतर सोडले*
*सावनेर : शहरातील बसस्थानक संकुलातील सूर्या लाँज सावनेर पोलिसांनी छापा टाकून सुमारे सहा जोड्या संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.*
* मिळालेल्या माहितीनुसार, सावनेर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दुपारी 12-30 च्या सुमारास एपीआय शिवाजी नागवे यांच्या नेतृत्वात पोलीस निरिक्षक मारुती मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली महिला अधिकाऱ्यांसह छापा टाकून लाजच्या सर्व खोल्यांची झडती घेतली असता, संशयित 6 जोडपे प्रेमी युगुलांना पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
पोलिसांनी अचानक केलेल्या कारवाईमुळे लाज व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
*गुप्त माहितीच्या आधारे सूर्या लांज येथे केलेल्या या कारवाईत काटोल, कळमेश्वर, उपलवाडी साहित्य मध्य प्रदेश सौसर, छिंदवाडा आदी ठिकाणी संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. योग्य चौकशी करून त्यांना पाठविण्यात आले.एपीआय शिवाजी नागवे यांच्या नेतृत्वात एएसआय विजय पांडे, पोलीस कर्मचारी मनीषा बंडीवार, सुप्रिया पाटील आदींनी ही कारवाईत भाग घेतला.

*कारवाई सुरूच राहील*
(पो.नी.मारुती मुळुक)
लाॅज चालकांना न्यायदंडाधिकार्यांनी लाज चालवण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचना व नियमांचा अवमान कींवा दुर्लक्ष केल्याचे आढळून आल्यास कलम 188 अन्वये कडक कारवाईची तरतूद असुन तशी कारवाई करण्यात येणार असल्याचे, तसेच स्थानिक पोलिसांचे एक पथक तयार करुण शहरातील लाँजवर करडी नजर ठेवली जात असुन नियमित तपासणीसाठी विशेष पथक तयार करून लाजमध्ये सुरू असलेल्या कारवायां अश्याच वरच्यावर सुरु राहणार असुन गुप्त माहितीच्या आधारे सापडलेल्या संशयित जोडप्याला चौकशीनंतर सोडून देण्यात आल्याची माहिती दीली.
*आज करण्यात आलेल्या या कारवाईमुळे आणि स्थानिक पोलिसांच्या वाढत्या कारवाया यामुळे लाज चालकांच्या कपाळावर बळ पडू लागले आहे.