कन्हान येथे शिक्षक दिवस निमित्य शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार* कन्हान शहर विकास मंच द्वारे आयोजन

*कन्हान येथे शिक्षक दिवस निमित्य शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार*

कन्हान शहर विकास मंच द्वारे आयोजन

कन्हान – कन्हान येथे शहर विकास मंच द्वारे शिक्षक दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान च्या गार्डन मध्ये करण्यात आले असुन कार्यक्रमात डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन , महात्मा ज्योतिबा फुले , सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन ,१०वी , १२वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांचा सत्कार करुन व शिक्षकांचा सत्कार करुन कार्यक्रम थाटात साजरा करण्यात आला


रविवार दिनांक ५ सप्टेंबर २०२१ ला शिक्षक दिवस निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान च्या समोर असलेल्या गार्डन मध्ये करुन कार्यक्रमाचे अध्यक्ष शहर विकास मंच चे जेष्ठ नागरिक कामेश्वर शर्मा , प्रमुख अतिथि बळीरामजी दखने हायस्कुल च्या मुख्याध्यापिका विशाखा ठमके , पंडित जवाहरलाल नेहरू कनिष्ठ महाविद्यालय कन्हान च्या माजी मुख्याध्यापिका वर्षा भास्कर सिंगाळे , शिक्षक सुनिल लाडेकर , सुनिल काळे , यांच्या हस्ते डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन , महात्मा ज्योतिबा फुले , व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच च्या सर्व पदाधिकार्यांनी संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सर्व शिक्षकांचे शाॅल , श्रीफल , व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला असुन १०वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या १) चारवी खंडार ९६.८०% २) निशिता गोडबोले ९३.८० % ३) निष्ठा काळे ८८.६०% व १२वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या १) मोनिका गजभिए ९२.३०% यांना स्टेशनरी व शील्ड देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी कार्यक्रमात कन्हान शहर विकास मंच चे जेष्ठ नागरिक भरत सावळे , बळीरामजी दखने हायस्कुल च्या मुख्याध्यापिका विशाखा ठमके , पंडित जवाहरलाल नेहरू कनिष्ठ महाविद्यालय कन्हान च्या माजी मुख्याध्यापिका वर्षा भास्कर सिंगाळे , शिक्षक सुनिल लाडेकर , यांनी विकास मंच च्या पदाधिकार्यांना व उपस्थितांना मार्गदर्शन केले असुन अल्पोहार वितिरित करुन शिक्षक दिवस कार्यक्रम थाटात साजरा करण्यात आला .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच चे महिला पदाधिकारी सुषमा मस्के , वैशाली खंडार , प्रशांत मसार , दिपक तिवाडे , लक्ष्मण बावनकुळे , अविनाश काळे , नरेश बोंडे , गेंदलाल बेलतुले , विलास वेंडेल , सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .


कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कन्हान शहर विकास मंच चे संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , हरीओम प्रकाश नारायण , विनोद कोहळे , हर्ष पाटील , महेंन्द्र साबरे , किरण ठाकुर , शाहरुख खान , सह आदि मंच पदाधिकारी यांनी उपस्थित राहुन सहकार्य केले . कार्यक्रमाची प्रास्ताविका विनोद कोहळे यांनी मांडली असुन कार्यक्रमाचे सुत्र संचालन शिक्षक सुनिल लाडेकर यांनी केले तर आभार मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर यांनी मानले .

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

धर्मराज शैक्षणिक संस्थेतर्फे कल्याणी सरोदेंचा सत्कार

Thu Sep 9 , 2021
*धर्मराज शैक्षणिक संस्थेतर्फे कल्याणी सरोदेंचा सत्कार* कन्हान – येथील प्रसिद्ध ब्युटीशीयन कल्याणी सरोदे हिचा नुकताच धर्मराज शैक्षणिक संस्थेतर्फे आज (ता ६) कौटुंबिक सत्कार करण्यात आला. धर्मराज शैक्षणिक संस्थेतून २००८ रोजी शिक्षण घेतलेल्या कल्याणीने अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून ब्युटीशीयन मध्ये करीअर अजमावले आहे. ती सध्या एक नामांकित ब्युटीशीयन असून चित्रपट सृष्टीतील […]

You May Like

Archives

Categories

Meta