नयाकुंड शिवारात मादा बिबटया च्या शिकार प्रकरणातील आरोपीस अटक : वन विभागाची कार्यवाही

नयाकुंड शिवारात मादा बिबटया च्या शिकार प्रकरणातील आरोपी अटक,वन विभागाची कार्यवाही

.कमलसिंह यादव
पाराशिवनी तालुका प्रतिनिधी

पारशिवनी:-(ता प्र) रामटेक वनपरिक्षेत्र अंतर्गत पटगोवारी उपवन क्षेत्रातील येथील वासनिक चे शेतात मृत पावलेल्या बिबट्याची शिकार झाल्याचे स्पष्ट झाले ,असून या प्रकरणी एका आरोपी भारसाखरे यास अटक करण्यात वनखात्याला यश आले आहे
नयाकुड येथील मौजा नयाकुड शिवार शेत सर्वे क्रमांक ५५७। हा शेत राहुल वासनिक यांच्या शेतात 30 सप्टेंबरला मादी बिबट्या मृतावस्थेत आढळले, शवविच्छेदना करण्यासाठी त्याला सेमिनरी हिल येथील ट्रांझिस्ट ट्रिटमेंट केंद्रात आणले, त्याच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी नमुने घेण्यात आले, त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी व वनाधिकारी कर्मचाऱ्यांच्या समस्या अंत्यसंस्कार करण्यात आले, चौकशीदरम्यान नयाकुड येथील मारुती भारसाखरे यांच्या शेतात मांश व हाडाचे तुकडे दिसुन आले ,चौकशी केली असता त्यांनी गायीच्या अर्धवट खाल्लेल्या शरीरावर रसायन टाकण्याचे कबूल केले. गाय खाल्ल्यामुळे शारीरावर रसायन टाकाल्याचे कबुल केले, बिबट्या नी गाई खालल्यामुळे ब्रिबटाचा मृत्यु झाला , तपास अधिकारी व रामटेक वनपरिक्षेत्र अधिकारी आर डी शेंडे यांनी व्हाईल लाईफ एक्ट १९७२नुसार २, ९, ५२, तहत अटक भारसाखरे यांना अटक करून पासून येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी समोर हजर केले .
प्रादेशिक वन विभागाचे उपवनसंरक्षक डॉक्टर प्रभुनाथ शुक्ल यांचे मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहायक डी आर आगळे, सहायक वन संरक्षक अधिकारी एस एफ गिरी, राउन्ड आफिसर मिनाक्षी ,एम एम गोणमारे, वनरक्षक एस एस राठोड ,एस एन कोरवार, एम जे टेकाम यानी ही कामगिरी पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

पारशिवनी खापा रोड वर रस्ता दुभाजकावर वाहन आदळल्याने चालकाचा मृत्यू

Fri Oct 9 , 2020
*पारशिवनी खापा रोड वर रस्ता दुभाजकावर वाहन आदळल्याने चालकाचा मृत्यू* कमलसिंह यादव पाराशिवनी तालुका प्रातिनिधी पाराशिवनी (ताः प्र):-पारशिवनी न्यायालय समोर खापा ला जातांना समोरून येणारे  वाहनाचा लाईट चा उजेड डोळ्यावर पडल्याने मृतक चालकाचे गाडीवरील संतुलन बिघडुन वाहन क्रमांक एम एच ४०,बि एल ०८२९ हा वाहन डिवायटर वर चढुन रोड वर […]

You May Like

Archives

Categories

Meta