वराडा पेट्रोल पंप जवळ सर्व्हीस रोडवर उभ्या ट्रकचे रात्री ४३ हजार रूपयांचे डिझेल चोरी

वराडा पेट्रोल पंप जवळ सर्व्हीस रोडवर उभ्या ट्रकचे रात्री ४३ हजार रूपयांचे डिझेल चोरी. 

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत ७ किमी अंतरावर असलेल्या वराडा शिवारातील राष्ट्रीय महामार्गावरील  एमएचकेएस पेट्रोल पंप जवळ उभ्या असलेल्या एका ट्रक मधुन कोणीतरी अज्ञात आरोपीने डिझल चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी च्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आरोपीचा शोध घेत आहे.

          प्राप्त माहिती नुसार बुधवार (दि.६) ऑक्टोंबर २०२१ ला रात्री ११:३० वाजता ते गुरुवार (दि.७) ऑक्टोंबर २०२१ ला सकाळी ४:३० वाजता च्या सुमा रास दिनेश गोपाल बावीसताले वय ३८ वर्ष राह. खैरी जिल्हा बालाघाट या ट्रक चालकांनी फोन करून सांगि तले कि ट्रक क्र एमपी ०४ एच ई ४३३५ हा एमएचके एस पेट्रोल पंप वराडा येथे डिझेल भरून सर्विस रोड वर लावुन रात्री ट्रकच्या कैबिन मध्ये झोपला असता कोणीतरी अज्ञात चोराने ट्रकचे डिझल टॅंक मधुन अंदा जे ४५० लीटर डिझेल किंमत ४३,००० रूपयाचे चोरून नेल्याच्या फिर्यादी दिनेश बावीसताले यांच्या तोंडी रिपोर्ट वरून कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्र. ३७३/२०२१ कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात हेड कांस्टेबल नरेश वरखडे हे करीत असुन ़आरोपीचा शोध घेत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

स्थानिय ट्रांसपोर्ट ना टोल फ्री करण्याची मागणी : करणार चक्का जाम आंदोलन

Sat Oct 9 , 2021
स्थानिय ट्रांसपोर्ट ना टोल फ्री करण्याची मागणी #) आज ट्रासंपोर्ट मालकांचे श्यामकुमार बर्वे च्या नेतृत्वात टोल नाक्यावर चक्का जाम आंदोलन. कन्हान : – तारसा रोड चौक कन्हान ते गहुहिवरा- चाचेर मार्गावरून जड वाहतुक बंद करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत असल्याने (दि.३०) सप्टेंबर पासुन गहुहिवरा-चाचेर मार्गावरून जड वाहतुक बंद करण्यात आल्याने […]

You May Like

Archives

Categories

Meta