
घाटंजी : आज संत श्री रामराव महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी माननीय श्री माजी मंत्री शिवाजीराव मोघे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला घाटंजी येथील संत सेवालाल महाराज मंदिरावर सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . संत रामराव महाराज यांच्या कार्य विषयी प्रकाश टाकून त्यांनी गोरबंजारा तसेच इतर समाज बांधवांमध्ये एकोप्याचा भावना निर्माण करून देश संघटित कशी राहील आणि देशातील समाज व्यसनापासून दूर कसे करता येईल यावर महाराजांनी अहोरात्र काम केल्याचे ऍड मोघे यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमाला तांड्याचे नायक नामदेवराव आडे, नायक सुधाकर राठोड,राष्ट्रीय बंजारा टायगर्स जिल्हाध्यक्ष अरविंदभाऊ जाधव,डाव बंडूभाऊ जाधव डॉक्टर अरविंद भुरे साहेब, विजुभाऊ मोघे,अभिषेक भाऊ ठाकरे, रुपेश कल्यमवार,मारोती पवार किशोरजी दावडा,आशिष लोणकर, सुभाष गोडे,परेश भाऊ कारिया, विजय कडू, माणिक मेश्राम,अनंत चवधरी,संजय गोडे,संत से.म.चॅ.ट्रस्ट चे अध्यक्ष कैलास राठोड वामनराव राठोड, सहदेव राठोड, मनोज राठोड,तुकाराम जाधव,सीताराम राठोड,ब्रम्हानंदजी चव्हाण,सुनील जाधव,प्रेमदास राठोड,अमृत पेंदोर, अनील राठोड,संजय आडे,बबलू राठोड,गणेश राठोड,बंजारा टायगर चे कार्यकर्ते, ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे कार्यकर्ते. कर्मचारी बंजारा सेवा संघ,इतर समाज बांधव व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.