पिपरी हनुमान मंदिरात दिवाळी पहाट भक्तीसंध्या व स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न

पिपरी हनुमान मंदिरात दिवाळी पहाट भक्तीसंध्या व स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न

कन्हान :- तालुक्यातील पिंपरी-कन्हान येथील श्री हनुमानजी मंदिर येथे दिपावली भाऊबिज च्या पावन पर्वावर दिवाळी पहाट भक्तीसंध्या व स्नेहमिलन कार्यक्रम थाटात संपन्न झाला. 

       रविवार (दि.७) नोव्हेंबर ला सांयकाळी ६ वाजता पिपरी-कन्हान येथील श्री हनुमान मंदीरात श्री शारदा तालनिकेतन विद्यालय व संगीत मित्र समुह कन्हान पारिसर च्या सुयंक्त विद्यमाने दिपावली, भाऊबिज च्या पावन पर्वावर भजनसंध्या कार्यक्रमाने दिवाळी पहाट भक्तीसंध्या व स्नेहमिलन कार्यक्रम थाटात संपन्न झाला. यात संगीत शिक्षक श्री शत्रुघ्न पाहुणे, तबला वादक श्री. राजु बावणे यांचे संवादिनी वादन व कुमार उज्ज्वल तितरमारे आजनी (रडके) आणि कुमार बावणे पिपरी यांनी सुंदर तबलावादन करीत साथ संगत केली. तालवाद्य मोरेश्वर फुटाणे, गायन राजेंद्र मेश्राम, किशोर वासाडे, राजु धोटे, अजय भोसकर, विठोबा घारड, गणेश रामापुरे यांनी सुंदर साथ देत  दिवाळी पहाट भक्तीसंध्या व स्नेहमिलन कार्यक्रम थाटात संपन्न केला. 

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

बखारी येथे ढिवर समाजाचा दिवाळी मिलन थाटात संपन्न

Tue Nov 9 , 2021
बखारी येथे ढिवर समाजाचा दिवाळी मिलन थाटात संपन्न कन्हान : –  तालुक्यातील पेंच नदी काठावरील  बखारी गावात ढिवर समाजाचे दिवाळी मिलन कार्यक्रम मोठया उत्साहात थाटात संपन्न झाला.                       पारशिवनी तालुक्यातील बखारी गावात ढिवर समाज दिवाळी मिलन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा सुखदेव मेश्राम सामाजिक […]

You May Like

Archives

Categories

Meta