बखारी येथे ढिवर समाजाचा दिवाळी मिलन थाटात संपन्न

बखारी येथे ढिवर समाजाचा दिवाळी मिलन थाटात संपन्न

कन्हान : –  तालुक्यातील पेंच नदी काठावरील  बखारी गावात ढिवर समाजाचे दिवाळी मिलन कार्यक्रम मोठया उत्साहात थाटात संपन्न झाला.       

              

पारशिवनी तालुक्यातील बखारी गावात ढिवर समाज दिवाळी मिलन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा सुखदेव मेश्राम सामाजिक नेते तर प्रमुख पाहुणे फागो उके, हरिदास कुरवाडे, ईश्‍वर खंगार पत्रकार, लिलाधर उकेपैठे, बाळकृष्ण खंडाटे, ग्रा पं बखारी चे उपसरपंच कैलास शेंडे, अरविंद मेंश्राम, राजेराम वाघधरे, प्रभाकर केळवदे, गजानन सहारे, वासुदेव खंडाटे, क्रिष्णा दुधुके आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी ढिवर समाजाचे शैक्षणिक, आर्थिक, राजकीय मागासलेपणा, मासे मारी व सामाजिक आरक्षण अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच देश स्वतंत्र झाल्या पासुन ७४ वर्षे तर महाराष्ट्र राज्य निर्मितीपासून ६१ वर्षे होऊन देशात व राज्यात भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी व अन्य पक्षांचे सरकारे आलीत. सामाजिक सर्वेक्षणात जात, शिक्षण आणि आर्थिक तत्थ्यांवर अभ्यास करून शासनाने ढिवर समाजाच्या विकासा साठी उपाययोजना करणे आवश्यक होते. परंतु सर्वच राजकीय पक्षांनी याकडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष केल्याने ढिवर समाज मागासलेला असल्याचा थेट आरोप ढिवर समाजाचे नेते सुखदेव मेश्राम यांनी केला. यामुळेच यापुढे राजकीय नेत्यांच्या मागे न धावता एकीने सामाजिक विकासासाठी संघटन स्वरूपात संघर्षातुन लढा देण्याची आवश्यकता आहे. तसेच आता पुढे सरकार विरोधात ढिवर समाज जागृती व संघटन बांधणीचे कार्य आपण हाती घेतले असुन समाजातील युवकही सक्रीय होऊन पुढे येत आहेत. असे प्रतिपादन सुखदेव मेश्राम यांनी केले. याप्रसंगी बहुसंख्यने ढिवर समाज बांधव महिला पुरूष उपस्थित होते.

         ढिवर समाज दिवाळी मिलन कार्यक्रमाचे सुत्र  संचालन पत्रकार ईश्‍वर खंगार यांनी तर बखारीचे उप सरपंच कैलास शेंडे यांनी आभार व्यकत केले. यशस्वि तेकरिता संजय शिंदेमेश्राम, श्रीकांत केवट, ज्ञानेश्‍वर खंडाटे, युवराज शेंडे, विशाल सहारे, इंद्रपाल केवट, प्रितम गोंडाणे, शैलैंद्र मेश्राम, कैलास केवट, बंडु सहारे, वासुदेव सहारे आदींनी सहकार्य केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सावनेर येथे दिवाळी पहाट

Tue Nov 9 , 2021
  *इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सावनेर येथे दिवाळी पहाट* सावनेर :  चतुर्थी च्या निमित्ताने आयोजित करण्यात आले. मराठी हिंदी भक्ती व भावगीतांचा सुमधुर कार्यक्रम म्हणजे दिवाळी पहाट. या कार्यक्रमाचे सादर करते नागपूर शहरातील सुप्रसिद्ध स्वर रंग म्युझिकल ऑर्केस्ट्रा ग्रुप होते. कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध कलाकार श्री संजय ठोसर व महाराष्ट्र शासनाकडून पुरस्कृत […]

You May Like

Archives

Categories

Meta