ग्रामपंचायत निवडणूक लढविणार्‍या तरुण उमेदवाराची आत्महत्या

कामठी  : येत्या १५ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या कामठी तालुक्यातील महालगाव ग्रामपंचायतीची निवडणूक लढविणाऱ्या एका उमेदवाराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी ( ता.९ ) दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली असून आत्महत्या केलेल्या तरुण उमेदवाराचे नाव प्रवीण भगवान धांडे ( २३ , महालगाव ) असे आहे . सविस्तर वृत्त असे की , येत्या १५ जानेवारी रोजी तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी निवडणुका होत असून त्यात महालगाव ग्रामपंचायतीचा समावेश आहे .

या ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेल्या प्रभाग क्रमांक तीन ( अ ) मधून दोनच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते . त्यात प्रवीण भगवान धांडे व छत्रपती वसंतराव मुळे यांचा समावेश होता . ग्रामपंचायतीच्या
निवडणुकीची रंगत वाढत असताना अचानक यातील कांग्रेस समर्थीत ग्रामविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण धांडे याने शनिवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास राहत्या घरी बंद खोलीमध्ये जाऊन गळफास घेतला . प्रवीण दुपारी तीन वाजेपर्यंत आपल्या समर्थकासह वार्डात प्रचार करून दुपारी सव्वातीन वाजताचे सुमारास घरी आला व रातील खोलीत गेला . दुपारी चार वाजता सुमारास आई खोलीत गेली असता प्रवीण छताला दोराने लटकलेल्या अवस्थेत दिसून आला . प्रवीणला बघून आईने एकच हंबरडा फोडून शेजाऱ्यांकडे मदतीसाठी धाव घेतली . दरम्यान मृतकला उपचारासाठी भवानी हॉस्पिटल नागपूर येथे नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले . मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूरच्या मेयो इस्पितळात हलविण्यात आले . पोलिसांनी या घटनेसंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे . मृत प्रवीण याचे वडील २०१० मध्ये महालगाव ग्रामपंचायतचे सरपंच होते . त्यांनीसुद्धा सरपंच असताना आत्महत्या केली होती .

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

सिहोरा घाटातुन रेती चोरून नेणारा ट्रॅकटर पकडला

Tue Jan 12 , 2021
सिहोरा घाटातुन रेती चोरून नेणारा ट्रॅकटर पकडला कन्हान : – नदीच्या सिहोरा घाटातुन रेती चोरी करून अवैध वाहतुक करणार्‍या बिना नम्बर ट्रॅक्टर ट्रॉली ला कन्हान पोलीसांनी रात्री गस्तीवर असताना पकडुन पाच लाख तीन हजार रूपयांचा माल जप्त करून कारवाई करण्यात आली.        कन्हान पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरिक्षक […]

You May Like

Archives

Categories

Meta