कन्हान नगरपरिषद ला विधान परिषद आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची कृतज्ञता भेट

कन्हान नगरपरिषद ला विधान परिषद आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची कृतज्ञता भेट

#) नगराध्यक्षा, नगरसेवकांनी स्वागत करून विविध समस्या सोडविण्याची केली मागणी.

कन्हान : – विधान परिषद निवडणुकीत निवडुन आले ले नवनियुक्त आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कन्हान-पिपरी नगरपरिषद ला भेट दिली असता नगरा ध्यक्षा सह नगरसेवकांनी पुष्पगुच्छ देऊन भव्य स्वागत सत्कार करण्यात आला. त्यानंतर आढावा बैठकीत नगराध्यक्षा, नगरसेवकांनी शहरातील विविध जटील समस्याशी अवगत केल्याने आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी विधान परिषदेत शासना पुढे समस्या मांडुन तात्काळ सोडविण्याचे आश्वासन दिले.


शनिवार (दि.८) जानेवारी ला सायंकाळी ७ वाजता दरम्यान कन्हान-पिपरी नगरपरिषद ला नागपुर विधान परिषद नवनिर्वाचित आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे आगमन होाच ढोल ताशाच्या गजरात व पुष्पगुच्छ देऊन भव्य स्वागत करण्यात आले. त्या नंतर नगरपरिषद कार्यालयात आढावा बैठक घेतली असता नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर, नगरसेवक राजेंद्र शेंदरे सह नगरसेवकांनी शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या, कन्हान नदीवरील पुलाची समस्या, स्थाई मुख्याधिकारी, साप्ताहिक बाजारास जागेची समस्या, बसस्टाप सहित अनेक विविध समस्याबाबत अवगत केले असता त्यांनी विधान परिषदेत शासना पुढे समस्या ठेऊन तात्काळ सोडविण्याचे पर्यंत कर ण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डी मल्लीकार्जुन रेड्डी, जिल्हा परिषद सदस्य व्यंकटेश कारेमोरे, संकेत बावनकुळे, कन्हान-पिपरी नगरपरिषद नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर, उपाध्यक्ष डायनल शेंडे, माजी नप उपाध्य क्ष व नगरसेवक योगेंन्द्र रंगारी, नगरसेवक अनिल ठाकरे, राजेंद्र शेंदरे, राजेश यादव, मनिष भिवगडे, नग रसेविका रेखा टोहणे, गुंफा तिडके, पुष्पा कावडकर, सुषमा चोपकर, संगीता खोब्रागडे, अनिता पाटील, मौनिका पौणिकर, वंदना कुरडकर, माजी नगरसेवक मनोज कुरडकर, अजय लोंढे, नगरपरिषद अधिकारी संकेत तालेवार, फिरोज बिसेन, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा नागपुर जिल्हा उपाध्यक्ष रिंकेश चवरे, भाजपा पारशिवनी तालुकाध्यक्ष अतुल हजारे, अनु सूचित जाती मोर्चा तालुकाध्यक्ष लिलाधर बर्वे, भाजपा कन्हान शहराध्यक्ष डॉ मनोहर पाठक, महामंत्री सुनील लाडेकर, महामंत्री माधव वैद्य, शहर महिला अध्यक्ष तुलेषा नानवटकर, महामंत्री सुषमा मस्के सह पदाधि कारी व नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत भातगट प्रात्याक्षिक व शेतीदिन साजरा

Mon Jan 10 , 2022
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत भातगट प्रात्याक्षिक व शेतीदिन साजरा कन्हान : – पारशिवनी तालुका कृषी विभागांतर्गत नांदगाव (एंसबा) येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान २०२१-२२ भात पिक प्रात्यक्षिक व्दारे शेतक-यांना मार्गदर्शन करून शेती दिन साजरा करण्यात आला. नांदगाव (एंसबा) येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभि यान सन २०२१-२२ धान पिक प्रात्यक्षिक अंतर्गत शेतीदिन घेण्यात आला. […]

You May Like

Archives

Categories

Meta