कन्हान येथुन अशोक मोहीते हरविला असल्याची कन्हान पोलिसात तक्रार

कन्हान येथुन अशोक मोहीते हरविला आहे

कन्हान : – कळमना नागपुर येथुन तिघे जण बांगडया विक्री करिता आले असताना सायंकाळी दोघे जण परत आंबेडकर चौक येथे परत आले परंतु अशोक गणेश मोहीते न आल्याने नागपुर ला त्याच्या घरी पाहीले तसेच आजुबाजुला सगळी कडे शोधले असता मिळुन न आल्याने फिर्यादी अनिल सोनोने हयानी अशोक मोहीत कन्हान येथुन हरविल्याची तक्रार दाखल केली आहे.
शुक्रवार (दि.४) फेब्रुवारी ला १) अनिल बाबाराव सोनोने वय ३३ वर्ष २) अशोक गणेश मोहीते वय ४० वर्ष व ३) विश्राम रतन जाधव वय ३५ वर्ष, सर्व राह. बाजार गाव पांजरा, नागपुर ह.मु कळमणा नगर, रेल्वे क्रासींग जवळ नागपुर हे तिघेही ऑटोने कन्हान येथे सकाळी ८ वाजता आले. आणि तिघेही वेगवेगळया मार्गाने बांगडया विकण्या करिता गेले. सायंकाळी ५ वाजता दोघे जण आंबेडकर चौक कन्हान येथे आले. अशोक ची वाट पाहुन थकल्यावर कळमणा नागपुर च्या त्याच्या घरी विचारपुस केली. तो आला नव्हता. दोन तीन दिवस कन्हान, कामठी, नागपुर सगळी कडे त्या शोध घेतला परंतु तो मिळुन न आल्याने फिर्यादी अनिल बाबाराव सोनोने हयानी कन्हान पोलीस स्टेशन गाठुन अशोक मोहीत हरविल्याची तक्रार दाखल केली आहे. त्याचे वर्णन – अशोक गणेश मोहीते वय ४० वर्ष, सावळा रंग, उंची ५ फुट ५ इंच, कथ्था पँंट, निळया रंगाचा चेक चा सर्ट घातलेला असुन लांब मिशी, उजव्या हाताच्या दंडावर हनुमान व विंचु गोंदलेला असुन प्लास्टिक ची चप्पल घातली आहे. अश्या वर्णनाचा व्यकती कुणालाही आढळल्यास त्यानी कन्हान पोलीस स्टेशन ला संपर्क साधुन कळवावे.

१) अशोक गणेश मोहीते 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

शहीद प्रकाश देशमुख यांना श्रद्धाजंली : कन्हान शहर विकास मंच द्वारे

Mon Feb 14 , 2022
कन्हान ला शहीद प्रकाश देशमुख यांना श्रद्धाजंली #) कन्हान शहर विकास मंच द्वारे श्रद्धाजंली कार्यक्रमाचे आयोजन. कन्हान : – शहर विकास मंच द्वारे शहीद प्रकाश देशमुख यांचा २३ व्या स्मृती दिवसा निमित्य तारसा रोड शहिद चौक कन्हान येथे श्रद्धाजंली कार्यक्रमाचे आयोजन करून कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित रायभान देशमुख, लीलाबाई देशमुख, प्रदीप […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta