कन्हान शहर विकास मंच द्वारे सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी

कन्हान शहर विकास मंच द्वारे सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी

#) हनुमान मंदिर, गांधी चौक कन्हान येथे कार्यक्रमाचे आयोजन. 


कन्हान : – सावित्रीबाई फुले यांचा पुण्यतिथी निमित्य  हनुमान मंदिर, गांधी चौक कन्हान येथे कन्हान विकास मंच व्दारे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण , पुष्प अर्पित करित विनम्र अभिवादन करून सावित्री बाई फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. 

      बुधवार (दि.११) मार्च सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे हनुमान मंदिर, गांधी चौक कन्हान येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस कन्हान पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस स्वाती मॅडम यांचा हस्ते माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. सर्व मंच पदाधिका-यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी मंच सचिव प्रदीप बावने, अखिलेश मेश्राम, पौर्णिमा दुबे यांनी मार्गदर्शन केले.   

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंच सदस्य अखिलेश मेश्राम यांनी तर आभार मंच अध्यक्ष प्रविण गोडे यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रविण गोडे, उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर , सचिव प्रदीप बावने, संजय रंगारी, हरीओम प्रकाश नारायण, अखिलेश मेश्राम, प्रकाश कुर्वे, शाहरुख खान, प्रविण माने, सुषमा मस्के, वैशाली खंडार, सोनु खोब्रागडे सह मंच पदाधिका-यांनी सहकार्य केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

गुजरी व शुक्रवारी बाजारात दुकाने लावणा-या गरीब दुकानदारांकडुन बाजार कर वसूली त्वरीत बंद करण्याची मागणी : कन्हान शहर विकास मंच

Wed Mar 10 , 2021
*गुजरी व शुक्रवारी बाजारात दुकाने लावणा-या गरीब दुकानदारांकडुन बाजार कर वसूली त्वरीत बंद करण्याची मागणी* #)  कन्हान शहर विकास मंच चे नप मुख्याधिकार्यांना निवेदन कन्हान – कन्हान शहारात दररोज लागणा-या गुजरी बाजर  व शुक्रवारी आठवडी बाजार भाजीपाला व इतर सामान विकण्याचे दुकान लावणा-या गरीब दुकानदारांकडुन बाजार कर वसूली करण्याचा ठेका […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta