जिजाऊ ब्रिगेड कन्हान व्दारे जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमाने थाटात साजरा.

दिनाचे सार्थक होईल- वंदना सवंरवते

#) जिजाऊ ब्रिगेड कन्हान व्दारे जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमाने थाटात साजरा.

कन्हान : – जागतिक महिला दिना निमित्य जिजाऊ ब्रिगेड कन्हान व्दारे समाज भवन हनुमान नगर कन्हान येथे महिलांच्या सर्वागिण विकासात्मक विविध कार्य क्रमाचे आयोजन करून ८ मार्च जागतिक महिला दिन थाटात साजरा करण्यात आला.
मंगळवार (दि. ८) मार्च २०२२ ला जिजाऊ ब्रिगेड शाखा कन्हान व्दारे समाज भवन हनुमान नगर कन्हान येथे नगराध्यक्ष करूणाताई आष्टन कर यांचे अध्यक्षेत व प्रमुख अतिथी उपविभागीय अधिकारी रामटेक मा. वंदना सवंरवते, दखने हायस्कुल मुख्याध्यापिका विशाखा ठमके, डॉ स्वाती वैद्य, अँड मनिषा पारधी, नगरसेविका गुंफाताई तिडके, पुष्पाताई कावडकर, रेखाताई टोहणे, जिजाऊ ब्रिगेड कन्हान अध्यक्षा शिवमती मायाताई इंगोले, सचिव छायाताई नाईक आदीच्या प्रमुख उपस्थित राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जिजा ऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. सर्व प्रथम लहान मुलांचे नुत्य, कविता गायन माधुरी सातपुते, संध्या बेलसरे. सास्कृतिक कार्यक्रम निधी ईखार, साची राठी, वैदेही पारधी, सानवी मनगटे आणि वेणुताई बांते, गुफा तिडके, सुनंदा दिवटे, पुष्पा कोल्हे हयानी मनोगतातुन सुसंवाद साध ला. तदंनतर स्पर्धेतील विजयी प्रथम साची राठी, द्विती य कृष्णाली कोल्हे, तुतीय निधी कोल्हे, वेशभुषा सुषमा बांते याना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरणासह डॉ स्वाती वैद्य आरोग्य विषय, अँड मनिषा पारधी कायदे विषय क, विशाखा थमके अंधश्रद्धा आणि स्त्रिया आणि नगराध्यक्षा करूणाताई आष्टनकर हयांनी महिलाना संघटित होण्याचे आवाहन करून जागतिक मार्गदर्शन केले.
राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणेने एकविसव्या शतकात महिलांनी पुरूषा च्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात प्रगती साधली असुन आपल्या मुलीना आपले क्षेत्र निवडीचे स्वतंत्र दयावे. महिलानी आपल्या स्वत: व दुस-या एका महिलेत विकासात्मक मौलिक बदल घडवुन, एकमेकांना सहकार्य करून सामाजिक एकोपा निर्माण करित सर्वांगिन प्रगती साधल्यास महिला दिनाचे खरे सार्थक होईल. याप्रसंगी गौरवात्मक मार्गदर्शन मा वंदना सवंरवते उपविभागीय अधिकारी रामटेक हयानी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माया ताई इंगोले यांनी केले. सुत्रसंचालन सुनिता ईखार यानी तर आभार उज्वला लोंखडे हयानी व्यकत केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता जिजाऊ ब्रिगेड कन्हान अध्यक्षा मायाताई इंगोले, सचिव छायाताई नाईक, कमल गोतमारे, लताताई जळते, पुष्पा चिखले, अल्का कोल्हे, रंजना इंगोले, मायाताई भोयर, सुषमा बांते, विद्या रहाटे, सुनंदा दिवटे, सुनिता ईखार, कलावती डांगे, अनिता पाजुर्णे, शोभा अहिर, स्वेता नाईक, सुरेखा अवचट, मनिषा धुडस, अश्विनी भागवंत, सध्या बेलसरे, पुनम राठी, निलिमा कोल्हे, माधुरी सातपुते, प्रमिला चिंचुलकर, नितु ओडियार, राजेश्वरी ताई, रमाबाई वानखेडे, अनुपमा खंडाई त, सिंधु गिरडकर, संगिता वानखेडे, विमल चिंचुलकर, संगिता गि-हे, सुनिता चावके, कुंदा साखरकर, पुष्पा कोल्हे आदी सह महिलानी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान चाकु हल्यातील तीन आरोपींना अटक ; चौथ्या आरोपी चा शोधात

Tue Mar 15 , 2022
कन्हान चाकु हल्यातील तीन आरोपींना अटक चौथ्या आरोपी चा शोधात कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस एक कि मी अंतरावरील पांधन रोड ओम बुक डेपो जवळ चार आरोपी ने जुन्या डिजे वाजविण्याचा कारणावरून युवकास चाकुने मारून दुखापत करित गंभीर जख्मी केल्या प्रकरणी कन्हान पोलीसांनी तीन आरोपींना अटक केली असुन […]

You May Like

Archives

Categories

Meta