दोन  दहा चाकी ट्रक ७ ब्रास रेती चोरून नेताना दोघांना अटक

दोन  दहा चाकी ट्रक ७ ब्रास रेती चोरून नेताना दोघांना अटक

#) कन्हान पोली़ची कारवाई २१लाख २८ हजारचा मुद्देमाल जप्त. 

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत राष्ट्रीय चारपदरी महामार्गावर वाघोली शिवारात दोन दहा चाकी ट्रक मध्ये सात ब्राश रेती अवैधरित्या विना परवाना चोरून नेतांना कन्हान पोलीसांनी पकडुन एकुण २१ लाख २८ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी दोन्ही ट्रक चालकांना अटक केली.         

          प्राप्त माहीतीवरून शनिवार (दि. १०) ला सकाळी ८.३० वाजता दरम्यान दोन दहा चाकी ट्रक मध्ये अवैधरित्या विना परवाना रेती भरून चोरून नेत असल्याची गुप्त सुत्राच्या माहीती मिळाल्याने कन्हान पोलीस स्टेशनचे पोउपनि जावेद शेख हयांनी सहकार्यासह पेट्रोलींग दरम्यान नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावर वाघोली शिवारात रेती चोरी चे दहा चाकी ट्रक १) क्र. एम एच ४० बी एल १४०३, २) एमएच ४० बीजी ४१९७ चे ट्रक चालक १) देवेंद्र पुरणलाल तांडे कर वय ३२ वर्ष रा. कन्हान, २) अजय कैलाश काटेकर वय २४ वर्ष रा विजय नगर कळमना मार्केट जवळ नागपुर या दोन्ही आरोपीना पकडुन कन्हान पोलीसांनी अप क्र. ३८३/२० कलम ३७९,३४ नुसार गुन्हा दाखल करून दोन्ही दहा चाकी ट्रक किंमत २१लाख, ७ ब्रॉश रेती २८ हजार रू.असा एकुण २१लाख २८ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करित आरोपी दोन्ही ट्रक चालकांना अटक करून आरोपींना सुर्पुदनामावर सोडण्यात आले.

ही कारवाई कन्हान पोलीस स्टेशनचे पोउपनि जावेद शेख, सहकारी नापोशि प्रविण चव्हाण, पोशि वैभव बोरपल्ले, नापोशि जितेंद्र गांवडे हयांनी यशस्वीरित्या पार पाडली. यावर पुढील दंडात्मक कारवाई तहसिलदार पारशिवनी यांच्या आदेशान्वये करण्यात येईल. पुढील तपास पोउपनि जावेद शेख व सहकारी पोलीसकर्मी करित आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

अनोळखी व्यक्तिची गळा चिरुन हत्या ;खापा नरसाळा येथील घटना..

Sun Oct 11 , 2020
*इसमाची गळा चिरुन हत्या..* *खापा नरसाळा येथील घटना..* सावनेर  :- तालुक्यातील खापा नरसाळा शिवारात अज्ञात इसमाचा मृत देह आढळला… मिळालेल्या माहितीनुसार १० ऑक्टोबर च्या मध्यरात्री इसमाची हत्या करून रोड च्या किनारी गळा चीरुन फेकल्या चे सांगण्यात येत आहे.. शेतात जात असलेल्या नागरिकांना रोड च्या कडे रक्ताचे थेंब दिसून आल्याने रोडच्या […]

You May Like

Archives

Categories

Meta