*आंबेझरी उपसरपंच पदी भाऊराव राठोड यांची अविरोध निवड*
तालुका प्रतिनिधी घाटंजी :-
तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांमधून उपसरपंच निवडीचा कार्यक्रम दिनांक 9 जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयात पार पडला यावेळी आंबेझरी येथे उपसरपंच पदाच्या पार पडलेल्या निवडणुकीत भाऊराव बदुसिंग राठोड यांची अविरोध निवड झाली.प्रतिष्ठीत नागरिक नामदेवरावजी आडे यांच्या नेतृत्वात पालकमंत्री संजय राठोड समर्पित शिंदे गटाच्या सरपंच सोबतच उपसरपंच देखील निवडून आल्यामुळे आनंद व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे सात सदस्य संख्येच्या ग्रामपंचायत मध्ये इतरांकडे चार सदस्य असतांना उपसरपंचपदी भाऊराव बदुसिंग राठोड यांची अविरोध निवड झाल्यामुळे संपूर्ण ग्रामवासीयांना चालणारा उपसरपंच मिळाला असी चर्चा गावात रंगली होती.
यावेळी अध्याशी अधिकारी म्हणून नवनियुक्त सरपंच बादल विजय राठोड होते तर निरिक्षण अधिकारी म्हणून नायब तहसीलदार होटे साहेब यांनी कामकाज बघितले, यावेळी सहकारी म्हणून ग्रामसचिव मुनेश्वर हे देखील उपस्थित होते. सरपंच व उपसरपंच यांनी आपल्या निवडीचे श्रेय संपूर्ण ग्रामवासीयांना दिले हे विशेष.