अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे गंभीर जख्मी

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे गंभीर जख्मी

कन्हान, ता.११ जानेवारी

    बोरडा टोल नाक्याच्या समोर सर्व्हीस रस्त्याचा बाजुला पाच ते सात लोक पहाटे व्यामाम करतांना कन्हान कडुन येणाऱ्या चार चाकी वाहन चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवुन दोन ज्येष्ठ नागरिकांच्या पायावरून वाहन नेऊन गंभीर जख्मी केल्याने आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     पोलिसांच्या माहिती नुसार, सोमवार (दि.८) जानेवारी पहाटे ५ वाजता दरम्यान धर्मराज रामजी पोटभरे (वय ६२) रा. कांद्री नेहमी प्रमाणे वस्तीतली पाच ते सात लोकांना घेऊन पहाटे फिरायला घरुन निघाले. धर्मराज पोटभरे यांचा सोबत लक्ष्मीकांत श्यामलाल बिंझाळे (वय ६५) रा.कांद्री हे होते. बोरडा टोल नाक्या जवळ पोहचल्या नंतर सकाळी ६ वाजता दरम्यान सर्व्हीस रस्त्याचा बाजुला सर्व व्यायाम करित होते. कन्हान कडुन येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या चार चाकी वाहन चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन धर्मराज पोटभरे व लक्ष्मीकांत बिंझाळे यांच्या पायावरून नेऊन गंभीर जख्मी केले. अपघातात धर्मराज पोटभरे यांचे दोन्ही पाय फैक्चर झाले तर लक्ष्मीकांत बिंझाळे यांचा उजव्या पायाला मार लागल्याने फैक्चर झाले. दोन्ही जख्मींचा उपचार खाजगी रुग्णालय कामठी येथे सुरु असुन पोलीसांनी धर्मराज पोटभरे यांच्या तक्रारी वरून अज्ञात वाहन चालका विरुद्ध अप क्र. २०/२०२४ कलम २७९ , ३३७ , ३३८ भादंवि सहकलम मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपी वाहन व चालकाचा शोध घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

तेली समाज पंच कमेटी द्वारे संत जगनाडे महाराजाना अभिवादन 

Thu Jan 11 , 2024
तेली समाज पंच कमेटी द्वारे संत जगनाडे महाराजाना अभिवादन  कन्हान,ता.११ जानेवारी    कन्हान-कांन्द्री परिसरात संत जगनाडे महाराज यांचा पुण्यतिथी निमित्य त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पित करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.     तेली समाज पंच कमेटी द्वारे संत जगनाडे महाराज यांचा पुण्यतिथी निमित्य कार्यक्रमाचे आयोजन संताजी सभागृह मंदिरात करण्यात आला. कार्यक्रमात […]

You May Like

Archives

Categories

Meta