आज टेकाडी येथे भव्य रक्तदान शिबीर

आज टेकाडी येथे भव्य रक्तदान शिबीर

कन्हान : – समाज सुधारक माहात्मा ज्योतीबा फुले बहुउद्देशीय संस्था व राजे शिव हेल्थ क्लब टेकाडी च्या वर्धापन दिनी संस्थे व्दारे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. 

       शनिवार (दि.११) सप्टेंबर २०२१ ला सकाळी ९ ते १ वाजे पर्यंत राजे शिव हेल्थ क्लब, फुले चौक टेकाडी येथे भव्य रक्तदान शिबीरांचे आयोजन समाज सुधारक माहात्मा ज्योतीबा फुले बहुउद्देशीय संस्था व राजे शिव हेल्थ क्लब टेकाडी च्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास ग्रामोन्नती प्रतिष्ठाण, शिव शक्ती अखाडा व युवा चेतना मंच यांचे सहकार्य लाभणार आहे. समाज सुधारक माहात्मा ज्योतीबा फुले बहुउद्देशीय संस्था व राजे शिव हेल्थ क्लब टेकाडी च्या वर्धापन दिनी आयोजित भव्य रक्तदान शिबीरात परिसरातील युवकांनी उपस्थित राहुन रक्तदान करून आधुनिक युगात रक्तदान करून, गरजुना जिवनदान करण्यास सहकार्य करावे असे आवाहन स सु मा ज्योतीबा फुले बहु. संस्थेचे अध्यक्ष निलेश गाढवे हयानी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सत्रापुर येथील दुकानाच्या डॉवर मधिल पर्स चोरी

Sat Sep 11 , 2021
सत्रापुर येथील दुकानाच्या डॉवर मधिल पर्स चोरी #) मंगळसुत्र व नगदी तीन हजार रू.एकुण ७३ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरी.  कन्हान : –  सत्रापुर येथील सौ वैशाली मेश्राम यांच्या दुकानातील डॉवर मध्ये पर्स ठेऊन घराच्या आत चहा बनविण्या करिता जाऊन परत येत पर्यंत अज्ञात चोरा ने पर्स व त्यातील २४ ग्रम सोन्याचे मंगळसुत्र […]

You May Like

Archives

Categories

Meta