हिन्दू देवी – देवतांची फ़ोटो असलेले फटाके विक्री करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा
कामठी : श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान कामठी तर्फे हिंदू देवी-देवतांची फोटो असलेले फटाके विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाही करण्याबाबत तहसीलदार कामठी ह्यांना निवेदन देण्यात आले.

दरवर्षी प्रमाने ह्या वर्षी सुद्धा दिवाळी निमित्त बाजारात मोठ्या प्रमाणात फटाके विक्रीसाठी आलेले बऱ्याच फटाक्यांवर हिंदू देवी-देवतांची चित्रे आहेत. सदर फटाके फुटल्यानंतर हिंदू देवी-देवतांची चित्रे ही रस्त्यांवर सर्वदूर विखुरल्या जाते व नंतर लोकांकडून पायदळी तुडवल्या जातात. हा हिंदू देवी-देवतांचा अपमान आहे. करोडो लोकांच्या धार्मिक भावनांचा अपमान श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान कामठी तर्फे कदापी सहन केला जाणार नसल्याचे स्पष्टपणे निदर्शनास आणून दिले.
फटाक्यांवर हिंदू देवी-देवतांची चित्रे छापने हे कायद्याने गुन्हा आहे.
तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठानातर्फे तहसीलदार कामठी मार्फत विनंती करण्यात आली की, आपल्या हद्दीत येणाऱ्या संपूर्ण परिसरातील फटाके विक्रेत्यांच्या दुकानात जाऊन हिंदू देवी-देवतांची चित्रे असलेले फटाके जप्त करावे व फटाके उत्पादकावर व विक्रेत्यांवर प्रशासनामार्फत गुन्हे नोंदविण्यात यावे. तसेच हिंदू देवी-देवतांची चित्र असलेल्या फटाक्यांच्या विक्रीस मज्जाव करण्याची विनंती करण्यात आली.
त्याचप्रमाणे वरील मागणीवर ताबडतोब कारवाही करण्यात यावी अन्यथा श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान कामठी तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा सुद्धा देण्यात आला.
वरील प्रसंगी पंकज नालेंद्रवार हितेश बावनकुळे, अनिल देशमुख, चंद्रशेखर तुप्पट, सुमित शर्मा , निकेश टेकाडे, आयुष शेंडे कार्यकर्ते उपस्थित होते .