भोई ढिवर व तत्सम समाज उपवर वधु-वर परिचय सोहळा
कन्हान,ता.११ नोव्हेंबर
भोई विद्यार्थी संघटना व भोई ढिवर समाज विद्यार्थी कल्याणकारी बहुउद्देशिय संस्था च्या वतीने उपवर वधू-वर परिचय मेळावा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि सेवानिवृत्त कर्मचारी मान्यवरांचा सत्कार सोहळा रविवार, दि.१३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्री.गुरुदेव सेवाश्रम, आग्याराम देवी चौक, नागपूर येथे आयोजित करण्यात आला.
भोई ढिवर व तत्सम समाज बंधु-भगिनींनी समाज मेळाव्यात उपस्थित राहून वधू-वर परिचय कार्यक्रम स्थळी सादर करावा. तसेच वर्ष १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या वर्षात सेवा निवृत्त कर्मचारी अधिकारी व १० वी, १२ वी (९० टक्के प्राप्त गुण), पदवी, पदवीधर (६० टक्के प्राप्त गुण) च्या गुणवंत विद्यार्थ्यांनी आपली नावे संस्थेच्या सभासदांकडे दि.२ नोव्हेंबर २०२२ पर्यंत द्यावी. समाज बंधु भगिनींनी या सोहळ्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून मेळाव्याचा लाभ घ्यावा व समाज एकत्रिकरण्यांस सहकार्य करावे अशी विनंती भोई विद्यार्थी संघटने तर्फे करण्यात आली आहे.कार्यक्रमाचे उद्घाटक मा.चंद्रलाल मेश्राम, निवृत्त न्यायाधीश व सदस्य राज्य मागासवर्ग आयोग, पुणे उपस्थित राहतील.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अड.धानुजी उर्फ दादासाहेब वलथरे, अधिवक्ता, नागपूर, प्रमुख अतिथी मा.कृष्णाजी नागपूरे, अध्यक्ष भोई समाज सेवा संघ चंद्रपूर, मा. प्रकाशराव पचारे अध्यक्ष, मत्स्य सहकारी संघ, भंडारा, मा.माणिकजी गेडाम, माजी प्राचार्य गोंदीया, श्रीमती मिनाक्षी ताई गेडाम, सामाजिक कार्यकर्त्या, गडचिरोली, मा.संजयजी नान्हे, अध्यक्ष भोई समाज सेवा संघ, वर्धा, मा.मारोतराव पडाळ, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, अध्यक्ष भोई समाज सेवा संघ, यवतमाळ, मा.राहुलजी गौर, सचिव, भोई समाज पंचकमेटी, नागपूर मा.सुतेशजी मारवते, अध्यक्ष, ढिवर समाज सेवा संघटना, कन्हान आदी उपस्थिती राहतील.
यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी भोई विद्यार्थी संघटना नागपूर, भोई ढिवर समाज विद्यार्थी कल्याणकारी बहुउद्देशिय संस्था नागपूर, भोई ढिवर समाज मित्र बचत गट भोई समाज महिला बहुउद्देशिय संस्था नागपूर भोई महिला समाज बचत गट आदींच सहकार्य लाभेल.
Post Views: 860