प्रत्येक घरातील माता जिजाऊ असली की, शिवबा घडेल *कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन

* युवकांना दशरात्रौत्सव महोत्सवाची गरज- शांताराम जळते
* प्रत्येक घरातील माता जिजाऊ असली की, शिवबा घडेल
*कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन

कन्हान –  माँसाहेब मनाने जेवढ्या हळव्या होत्या, तितक्याच कणखरही होत्या.आजच्या युगातील मातांना कदाचित ते जमणार नाही. त्यामुळे, प्रत्येक घरात जर शिवबा जन्माला यायचा असेल तर प्रत्येक घरातील माता ही जिजाऊ असली पाहिजेत तसेच युवकांनी दशरात्रौत्सव महोत्सव साजरा करावा असे प्रबोधनवादी चळवळीचे पुरसकर्ते शांताराम जळते बोलत होते.


बुधवार (ता.12 )जानेवारी रोजी राष्ट्र राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद व सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्य राष्ट्रीय युवा दिवस प्राथमिक आरोग्य केंन्द्र ग्रीन जीम परिसरात कार्यक्रमाचे आयोजन  कन्हान शहर विकास मंच द्वारे करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष नागपुर जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष मोतीराम रहाटे ,प्रमुख पाहूणे जेष्ठ पत्रकार कमल यादव , मराठा सेवा संघ कार्यकर्ता, प्रबोधनवादी चळवळीचे पुरसकर्ते, डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद राज्य उपाध्यक्ष मा.शांताराम जळते सर, मंच मार्गदर्शक भरत सावळे व परमात्मा एक दांडपट्टा आखाडा निमखेडा मार्गदर्शक वस्ताद वखलकर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. कार्यक्रमात शांताराम जळते भाषणातून बोलत होते की, सामाजिक परिवर्तन, अनिष्ठ रूढीपंपरा, विधवा विवाह, अंधश्रद्धा, जात पात, शिक्षणाचे महत्त्व ज्यांनी पटवून दिले अशा महानायीका 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मदिन ते 12 जानेवारी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब जन्मदिन या दरम्यान युवावर्गानी दशरात्रौत्सव महोत्सव साजरा करून प्रेरणा घ्यावे.


याप्रंसगी परमात्मा एक दांडपट्टा आखाडा निमखेडा सावी वखलकर (गोल्ड) , साक्षी सुर्यवंशी (गोल्ड) , अविनाश वखलकर (गोल्ड) , उरशी मलेवार (सिल्वर) , अल्केश वखलकर (सिल्वर) , छकुली बावणे (ब्रान्झ) , बुलबुल वखलकर (ब्रान्झ) , शितल वखलकर (ब्रान्झ) , राहुल वखलकर (ब्रान्झ) , आदित्य बावने(ब्रान्झ) या विद्यार्थांना व विद्यार्थींनींना त्यांचा उत्कृष्ट कामगिरी बद्दल मान्यवरांचा हस्ते बुक, पेन व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
यावेळी ग्रामीण पत्रकार संघ सचिव सुनिल सरोदे ,जेष्ठ नागरिक प्रभारकर रुंघे , गौरव भोयर ,केतन भिवगडे , अरविंद नाईक ,प्रवीण हुड आदींसह नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .कार्यक्रमाचे सुत्र संचालन सामाजिक कार्यकर्ता निलेश गाढवे तर आभार मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर यांनी मानले .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता कन्हान शहर विकास संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , उपाध्यक्ष महेंद्र साबरे , सचिव हरीओम प्रकाश नारायण , सहसचिव सुरज वरखडे , कोषाध्यक्ष महेश शेंडे , सदस्य हर्ष पाटील , किरण ठाकुर , प्रकाश कुर्वे , सह आदि मंच पदाधिकार्यांनी सहकार्य केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रथम अध्ययनस्तर निश्चित करा

Thu Jan 13 , 2022
*गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रथम अध्ययनस्तर निश्चित करा* *गटशिक्षणाधिकारी तभाने मॅडम यांची सूचना* *वाचन प्रकल्पांतर्गत शाळांना भेटी व मार्गदर्शन* कन्हान – गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळणे हा प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्क आहे. त्यामुळे प्रत्येकापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहचविण्यासाठी प्रथम विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तर निश्चित करुन मग वाटचाल केल्यास विद्यार्थ्यांना त्याचा योग्य उपयोग होईल, असे आवाहन वाचन प्रकल्प […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta