अपेंडीक्स आजाराने त्रस्त पुनम ठाकुर हया मुलीस वेळेवर उपचार करून दिले जीवनदान

अपेंडीक्स आजाराने त्रस्त पुनम ठाकुर हया मुलीस वेळेवर उपचार करून दिले जीवनदान

#) समाजसेवी कार्यकर्ता व डॉक्टरांच्या अमुल्य सहकार्याने गरीब पुनमचे जीव वाचले.

कन्हान : – इंदर कॉलरी न ६ येथील गरिब, गरजु आ जाराने त्रस्त पुनम ठाकुर या मुलीची येथील सरपंचा, समाजसेवक, डॉक्टर, दवाखान्यातील कर्मचा-यांनी सहकार्य करून वेळेवर अपेंडीक्स या पोटाच्या आजा राचे ऑपरेशन करून पुनम ठाकुर ला जिवनदान देऊन मानवता धर्म, मानुष्की आजही जिवंत असल्या चा परिचय दिला.
टेकाडी (कोख) ग्राम पंचायत अंतर्गत इंदर कॉलरी नं.६ येथील अंत्यत गरिब पुनम ठाकुर ही वर्षा भरापासुन पोटाचा अपेंडिक्स आजाराने त्रस्त असुन जास्त त्रास होत असल्याचे येथील सरपंचा सुनीता मेश्राम ला कळताच सामाजिक कार्यकर्त्याची मदत घेत तिला सर्व प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान ला नेऊन डॉ योगेश चौधरी हयानी प्राथमिक उपचार करू न परिस्थिती नाजुक असल्याने दवाखान्याच्या रूग्णवा हीकेने कामठी येथील खाजगी आशा दवाखान्यात नेले असता त्वरित ऑपरेशन करण्याकरिता समाजसेवक रंजीत चंद्रवंशी हयानी अथक परिश्रम करित महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवुन दिल्याने आशा दवाखान्याच्या डॉक्टरांनी वेळेवर शल्य क्रिया (ऑपरेशन) केलाने पुनम ठाकुरला जिवनदान मिळाले.
पुनम ठाकुर या १६ वर्षीय मुलीचे आई वडील मिळेत ते हातमजुरी करून कसेतरी या पाच बहिन भा वासह अंत्य बिकट परिस्थितीत जिवन व्यापन करित असताना वर्षभर पुनमच्या पोटाच्या आजाराचा उपचा र न झाल्याने आजाराने रूद्र रूप धारण केले असताच टेकाडी च्या सरपंचा सुनिता मेश्राम समाजसेवक टिंकु सिंह, राहुल उके, अरविंदओझा आदीने सहकार्य करि त प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान ला डॉ योगेश चौधरी हयानी प्राथमिक उपचार करून त्वरित कामठी रवाना करून खाजगी आशा दवाखान्याचे प्रमुख डॉ. सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात मॅनेजर राम येरपुडे, डॉ. वर्मा, रविना मेश्राम, कल्याणी पुणेकर आदीनी महत्वा ची भुमिका बजावित सहकार्य केल्याबद्दल पुनम व ठाकुर परिवाराने डॉक्टरांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून सर्वाचे मनपुर्वक आभार मानले.

समाजसेवक रंजित चंद्रवंशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

खंडाळा ग्राम पंचायतीत महाविकास आघाडी चा विजय

Fri Feb 12 , 2021
खंडाळा ग्राम पंचायतीत महाविकास आघाडी चा विजय कन्हान : – गट ग्राम पंचायत खंडाळा (गहुहिवरा) च्या सार्वत्रिक निवडणुक २०२१ च्या सरपंच व उपसरपंच निवडणुकीत महाविकास आघाडी शिवसेना च्या गहु हिवरा येथील सौ विमलबाई बोरकुटे सरपंच तर खंडा ळा येथील कॉग्रेस चे चेतन कुंभलकर उपसरपंच म्हणु न निवडुन आल्याने ग्रामस्थानी जल्लोष साजरा […]

You May Like

Archives

Categories

Meta