नांदगाव बखारी राख तलावाच्या पंप हाऊस चे ट्रान्सफार्मर चोरी

नांदगाव बखारी राख तलावाच्या पंप हाऊस चे ट्रान्सफार्मर चोरी

कन्हान : – खापरखेडा औष्णिक विधृत केंद्रातुन निघणा-या जळालेल्या कोळसा राखे करिता पेंच नदी काठालगत नांदगाव बखारी च्या परिसरात नवनिर्मित राख तलावाच्या पंप हाऊस येथे लावलेले ट्रान्सफार्मर अज्ञात आरोपीने चोरी करून नेल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला अज्ञात आरोपी विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे. 

      प्राप्त माहिती नुसार राजु गोविंदा ढोरे वय ४३ वर्ष राह. केटीपीएस काॅलोनी कोराडी हे खापरखेडा पाॅवर प्लाॅंट येथे अतिरिक्त अभियंता म्हणुन काम पाहत असुन त्यांचे कंत्राटी पद्धतीने ट्रान्सफार्मर नांदगाव-बखारी खापरखेडा औष्णिक विधृत केंद्राच्या नवनिर्मित राख तलाव येथील पंप हाऊस ला लावले होते. बुधवार (दि. ३) नोव्हेंबर सायंकाळी ६ वाजता ते रविवार (दि.७) नोव्हेंबर ला दुपारी १२ वाजे दरम्यान नांदगाव- बखारी येथील पंप हाऊस मध्ये लावलेले विधृत ट्राॅन्सफार्मर कोणीतरी अज्ञात आरोपीने चोरून नेल्याचे सुपरवाइजर यांनी फोन करून राजु ढोरे यास सांगितल्याने घट नास्थळी जाऊन पाहणी केली असता तेथे बसविलेले तीन ट्रांसफार्मर पैकी दोनचे बुशिंग पडलेले दिसले व त्यातील तांब्याचे वायर दिसले नाही आणि ट्रांसफार्मर दिसला नसल्याने कोणीतरी अज्ञात आरोपीने ट्रांसफार्मर किंमत ७०,००० रुपयाचे चोरून नेल्याने कन्हान पोलीस स्टेशनला फिर्यादी राजु गोविंदा ढोरे च्या तक्रारीवरून कन्हान पोलीसानी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस नाईक राहुल रंगारी हे करीत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

दिवाळी पंचमी निमित्त रांगोळी स्पर्धा

Sat Nov 13 , 2021
*दिवाळी पंचमी निमित्त रांगोळी स्पर्धा* कामठी : दिवाळी पंचमी निमित्त दिनांक 9/11/ 2021 ला प्रभाग 12 कामठी येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन उपाध्यक्ष कामठी महिला आघाडी सौ अरुणा राजू बावनकुळे आणि सौ. किरण पुष्पराज मेश्राम यांच्या तर्फे करण्यात आले होते . या स्पर्धेमध्ये एकूण 115 महिला नागरिकांनी भाग घेतले असून सदर […]

You May Like

Archives

Categories

Meta