शहरातुन कोरोना हद्दपार करण्यास प्रतिबंधात्मक औषधीची फवारणी :ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान-पिपरी चा जन हितार्थ सेवाभावी उपक्रम. 

शहरातुन कोरोना हद्दपार करण्यास प्रतिबंधात्मक औषधीची फवारणी

#) ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान-पिपरी चा जन हितार्थ सेवाभावी उपक्रम. 

कन्हान : –  शहरात कोरोना विषाणु संसर्गाचा प्रादुर्भा व झपाटयाने पसरून दिवसेदिवस रूग्ण संख्या वाढत असल्याने ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान व्दारे गुढीपाड व्याला प्रभाग क्र. १ व २ मध्ये कोरोना प्रतिबंधात्मक  औषधीचे फवारणीने सॅनिटाईझेशन करून शुभारंभ करण्यात आला. 

        ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान-पिपरी व्दारे गुढीपाढ व्याचे औचित्य साधुन मंगळवार (दि.१३) ला सकाळी ७ वाजता मा. प्रकाश भाऊ जाधव यांच्या अध्यक्षेत व नगरपरिषद मुख्याधिकारी गिरिश बन्नोरे यांच्या हस्ते कन्हान शहरातुन कोरोना हद्दपार करण्याकरिता प्रभा ग क्र १ नाका न ७ येथुन कोरोना प्रतिबंधात्मक औष धीचे फवारणीने सॅनिटाईझेशन करण्याचा शुभारंभ करून प्रभाग क्र १ व २ चा महामार्ग, तारसा रोड, इंदि रानगर, शिवनगर, गजभिये लेआऊट, आंनदनगर,राधा कृष्ण नगर, तुकाराम नगरचा परिसर सॅनिटाईझेशन करण्यात आला. ही फवारणी दररोज सकाळी ६ ते ११ व सायंकाळी ४ ते ८ वाजेपर्यत करून संपुर्ण कन्हान शहर ग्रामोन्नती प्रतिष्ठाण च्या व्दारे फवारणी करून शहरातील नागरिकांतील कोरोना विषाणुची भिती कमी करण्यास, शहरातुन कोविड-१९ हद्दपार करण्यास जनजागृती करित जनहितार्थ सेवाभावी उपक्रम राबविण्यात येत आहे. याप्रसंगी ग्रामोन्नती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रकाश भाऊ जाधव, दिलीप राईक वार, मोतीराम रहाटे, गणेश भोंगाडे, महेश काकडे, सचिन साळवी, प्रमोद निमजे, अजय ठाकरे, गोविंद जुनघरे, प्रविण गोडे, सुतेश मारबते, रवि कोतपल्लीवा र, लक्ष्मीकांत पारधी, केतन भिवगडे, निलेश गाढवे, ऋृषभ बावनकर,निशांत जाधव, ऋृषभ दुधपचारे, विनोद भेलावे सह नगर प्रतिनिधीनी उपस्थित राहुन सेवाकार्य केले.   


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

आकस्मित भेटीतून 47 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर घेतले ताब्यात : सतिश मासाळ तहसिलदार सावनेर

Tue Apr 13 , 2021
आकस्मित भेटीतून 47 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर घेतले ताब्यात. सावनेर : जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सावनेर तालुक्यातील टाकळी भन्साळी हद्दीत असलेल्या श्रीधर स्टील कंपनी तसेच बोरुजवाडा हद्दीत असलेल्या काॅनफिडन्स पेट्रोलीयम कंपनीतून एकूण 47 oxygen चे सिलेंडर ताब्यात घेतले. सदरचे oxygen सिलेंडर कोविड रुग्णालयाकरीता उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सतीश मासाळ यांनी […]

You May Like

Archives

Categories

Meta