पतीच्या त्रासाला कंटाळुन केला खुन, खुनातील सूत्रधार पत्नीसह दोन आरोपी ताब्यात ; नरसाळा खापा हत्या प्रकरण

पतीच्या त्रासाला कंटाळुन केला खुन, खुनातील सूत्रधार पत्नीसह दोन आरोपी ताब्यात ; जयदीप लोखंडे हत्या प्रकरण

सावनेर : नरसाळा -खापा शिवारात रविवारी सकाळी ( ता .११ ) अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाच तासात मृतदेहाची ओळख पटविली . मृत जयदीप लोखंडे (वय ३९) खेडकर लेआऊट सावनेर अशी त्याची ओळख पटल्यानंतर जयदीपच्या मृत्यूचा तपासाची चक्र फिरवल्यानंतर पोलिसांनी मृताची पत्नी देवका उर्फ कविता जयदीप लोखंडे (३७) हिच या खुनाची सूत्रधार असल्याचे तपासात समोर आले .


केळवद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयदीप यांची पत्नी कविताला मारझोड करायचा तसेच मानसिक त्रास द्यायवा यांच्या जाचाला कंटाळून पतीला कायमचे संपविण्याच्या उद्देशाने खेळकर लेआऊट परिसरातील चंदन दियेवार (वय२८)या तरुणास हाताशी घेत पती जयदीप याला कायमचे संपवण्याचे कारस्थान रचण्यात आले . यासाठी जेल परिसर छिंदवाडा येथील रहिवासी आरोपी सुनील जयराम मालवीय (वय २७)याला पन्नास हजार रुपये देऊन जयदीपचा खून करण्याचे ठरले . शुक्रवारी (९) रात्री आरोपी चंदन याने सुनीलचा वाढदिवस असल्याचे जयदीप सांगितले. नारसाळा परिसरातील शेतात पार्टी करण्याकरिता चंदनच्या दुचाकी मोपेड गाडी क . एम.एच 40 बी.डब्लु 7565 बसून घटनास्थळावर नेले. त्या ठिकाणी आधीच सुनील उपस्थित होता. दोन्ही आरोपींनी जयदीपच्या गळ्यावर चाकूने वार करित त्याला ठार केले आणि घटनास्थळावरून पसार झाले. केळवद पोलिसांनी मृत जयदीप लोखंडे यांची पत्नी देवका उर्फ कविता जयदीप लोखंडे तसेच चंदन दियेवार यांना अटक करीत गुन्हा दाखल करण्यात आला .
यातील तिसरा आरोपी सुनील जयराम मालवीय जेल परिसर छिंदवाडा हा पसारा आहे .घटनेचा तपास केळवद ठाणेदार सुरेश मट्टामी यांच्या मार्गदर्शनाखाली केळवद पोलिस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

महिला अत्याचार विरोधात आक्रोश आंदोलन पाराशिवनी तालुका भारतीय जनता पार्टी चे निदर्शने

Tue Oct 13 , 2020
*महिला अत्याचार विरोधात आक्रोश आंदोलन पाराशिवनी तालुका भारतीय जनता पार्टी चे निदर्शने* कमलसिंह यादव पाराशिवनी तालुका प्रतिनिधी   पारशिवनी (ता प्र):-सोमवार दि 12 ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टी पारशिवनी तालुका व भाजपा महिला मोर्चा पाराशेवनी तालुका च्या वतीने महाविकास आघाडी सरकार चा निषेध करून आक्रोश आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रात महाविकास […]

You May Like

Archives

Categories

Meta