कन्हान परिसरात १३३१२ नागरिकांना लसीकरण
#) पारशिवनी तालुक्यात २६७१३ नागरिकांना लसीकरण करण्यात आले
#) कन्हान केंद्र १११६६ व साटक २१४६ एकुण १३३१२ नागरिकांना लसीकरण.
कन्हान : – तालुकात लसीचा साठा आल्याने पारशिवनी ग्रार्मिण रुग्णालया सह ग्रामीण भागातील पांच आरोग्य केन्द्र व १३ उप केंद्रां सह सर्व गावांत शिबीर लावले जात आहे. सर्व केंद्रात लसीचा साठा उपलब्ध आहे. एकंदरीत पारशिवनी तालुक्यात लसीकरणाला प्रतिसाद मिळत असुन कन्हान परिसर १३३१२ मिळुन तालुक्यात २६७१३ नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे.
पारशिवनी तालुक्यात शहर व ग्रामीण भागातील १९ केंद्रावर एकुण २६७१३ लोकांचे लसीकरण करण्यात आले. मंगळवार (दि.११) प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथ ४५ वर्षा वरील ९२ व १८ ते ४४ वर्ष – ८८ आणि साटक येथे ११ असे एकुण १९३ लसीकरण करण्यात आले. आता पर्यंत १) ग्रामिण रुग्णालय पारशिवनी केंद्र ७९७१, २) प्रा आ केंद्र डोरली ३५७३, ३) प्रा आ केंद्र नवेगाव खैरी १८५७,४) प्रा आ केंद्र साटक २१४६ ५) प्रा आ केंद्र कन्हान ९५५७, ६) जे एन दवाखाना कांद्री १६०९ लोकाना यात कन्हान १८ ते ४४ वर्षा पर्यत १७२७ लसीकरणा चा समावेश असुन एकुण तालुक्यात २६७१३ नागरि कांना लसीकरण करण्यात आले आहे. दररोज अधि काधिक लसीकरण होत असुन आता लसीकरणास नागरिक उत्सुकतेने वेग असल्याने ग्रामीण भागातील १९ केंद्रांवर २६७१३ लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये आरोग्य सेवक, फ्रंटलाईन वर्कस, ६० वर्षा वरील ज्येष्ठ नागरिक, व्याधी व्यक्ती (कोमॉ र्बिड) ४५ ते ६० असे पारशिवनी तालुक्यात एकुण २६७१३ लसीकरण करून १८ ते ४४ वर्षा पर्यतचे लसीकरण तालुकात एक मात्र कन्हान प्राथमिक आरो ग्य केद्रात सुरू आहे. पारशिवनी तालुका ५ प्राथमिक आरोग्य केन्द्र, १२ उपकेन्द्र, १ जे एन दवाखाना कांद्री व पारशिवनी शहरातील ग्रामिण रूग्णालाय असे एकुण १९ केन्द्रा व्दारे लसीकरण तालुका वैद्यकिय अधिकारी प्रशांत वाघ, तालुका कोरोना विभाग प्रमुख डॉ. तारीक अंसारी व ग्रामिणा रुग्णालयचे वैद्यकिय अधिकारी गजानन धुर्वे यांच्या मार्गदर्शनात डॉ दिप्ती पुसदेकर, डॉ. बर्वे, डॉ. रवि शेडे, डॉ वैशाली हिगें, डॉ योगेश चोधरी सह आरोग्य कर्मचारी परिश्रम करित आहे.