नगराध्यक्षाच्या घरी जाऊन चाकु दाखवुन मुलीना शिविगाळ :आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

नगराध्यक्षाच्या घरी जाऊन चाकु दाखवुन मुलीना शिविगाळ करित आईला पाहुन घ्यायची धमकी

#) कन्हान पोलीस स्टेशन चा घेराव करून असा माजिक तत्वास आळा घालण्याची मागणी.

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस दोन कि मी अंतरावर असलेल्या नप नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर यांच्या घरी जाऊन त्याच्या दोन मुलीला एका आरोपीने चाकु दाखवुन शिवीगाळ देत तुझ्या आईला पाहुण घेईन अशी धमकी दिल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला करूणाताई आष्टणकर यांच्या लेखी तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढी ल तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहिती नुसार बुधवार (दि.९) मार्च ला कन्हान नगरपरिषद नगराध्यक्षा करूणाताई आष्टणक र हया वाढदिवसाच्या कार्यक्रमाला बाहेर गेल्या असता शानु समशेर सिद्धिकी याच्या भावाने फोन करून सांगितले कि, माझा लहान भाऊ शानु हा तुमचा घरी चाकु घेऊन गेला आहे. त्याने आमचा घरी माझा व माझ्या वडिलावर चाकु उगरला आहे. यामुळे तातडीने नप नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर हया घरी पोह चल्या असता त्याच्या मुलीने सांगितले कि, शानु समशे र सिद्धिकी हयाने घरी येऊन आम्हा मुलींना धमकावुन आणि चाकु दाखवुन शिवीगाळ केली. आणि तुझ्या आईला पाहुण घेईन अशी धमकी देऊन निघुन गेला. यामुळे नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर हयानी कन्हान पोलीस स्टेशन गाठुन लेखी तक्रार केल्याने कन्हान पोलीसानी आरोपी शानु समशेर सिद्धिकी यांचे विरुद्ध ४४७, ५०४, ५०६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.

कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत शांती सुव्यवस्था कायम करण्याची महिला व नागरिकांची मागणी.

बुधवार (दि.९) मार्च २०२२ ला नगराध्यक्षा घरी नसताना त्याच्या घरी आरोपी शानु सिध्द्दीकीने जाऊन त्याच्या मुलीना चाकु दाखवुन धमकावित शिवीगाळ करून तुझ्या आईला पाहुन घेईन अशी धमकी दिली. हया घटनेमुळे कन्हान शहरात असाजिक तत्वाचा दिव सेदिवस बोलबाला वाढुन जर कन्हान च्या प्रथम नाग रिक नगराध्यक्षा च्या घरी चाकु घेऊन धमकी देण्यास भित नाही तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले असुन सुध्दा आरोपी ला पकडुन कडक कार्यवाही करताना दिसत नसल्याने कन्हान नगराध्यक्षा यांचे सह शहरातील महिला पुरूषानी गुरू वार (दि.१०) मार्च ला रात्री ७ वाजता पोलीस स्टेशन चा घेराव करून उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान हयांच्याशी चर्चा करून गुन्हेगारास त्वरित पकडुन कठोर कार्यवाही करावी. तसेच कन्हान शहरात दिवसेदिवस वाढणारे अवैद्य धंदे, अवैद्य नशे ली पदार्य, चोरी, गुन्हेगारी, असामाजिक तत्व यावर त्वरित अकुंश लावुन कन्हान शहरात शांती सुव्यवस्था कायम करण्यात यावी. अन्यथा जन आंदोलन करण्याचा इशारा देऊन कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत कायदा सुव्यवस्था प्रस्तापित करण्याची मागणी बहु संख्येने उपस्थित महिला व नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सेंट्रल बँकेच्या एटीएम मधुन ९७,७४६ रू काढुन चोरी

Tue Mar 15 , 2022
सेंट्रल बँकेच्या एटीएम मधुन ९७,७४६ रू काढुन चोरी #) कन्हान पोस्टे ला खाते धारक कामडे च्या तक्रारीने अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल. कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस एक कि मी अंतरावर असलेल्या सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया एटीएम मधुन कोणीतरी अज्ञात आरोपी ने ९७,७४६ रूपये काढल्याने कन्हान पोलीस स्टेशन […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta