वैद्यकीय एमबीबीएस अभ्यासक्रमात अँडमिशन करण्यावरून पिपरीच्या पालकांची फसवणुक

वैद्यकीय एमबीबीएस अभ्यासक्रमात अँडमिशन करण्यावरून पिपरीच्या पालकांची फसवणुक

#) हरिष तिवाडे ची चार आरोपीनी ११,०९,२०० रू. नी फसवणुक केल्याने गुन्हा दाखल.

कन्हान : – दुर्गा मंदीर पिपरी येथील हरिष तिवाडे यांची चार आरोपीनी संगमत करून त्याच्या मुलीचे सरकारी कोटयातुन वैद्यकीय एमबीबीएस अभ्यास क्रमात अँडमिशन करण्याकरिता ११,०९,२०० रूपये घेऊन अँडमिशन न करता फसवणुक केल्याने फिर्यादी च्या तक्रारीवरून कन्हान पोस्टे ला चारही आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. 

         कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत दुर्गा मंदिर चौक प्रभाग क्र.६ पिपरी-कन्हान येथील श्री हरिष मोतीराम तिवाडे वय ५२ वर्ष यांच्या मुलीचे सरकारी कोटयातुन  वैद्यकीय एमबीबीएस अभ्यासक्रमात अँडमिशन करण्याकरिता (दि.११) डिसेंबर २०२० चे ११:०० वाजता ते (दि.१५) फेब्रुवारी २०२१ चे ६:०० वाजता दरम्यान  आरोपी १) डॉ राकेश वर्मा रा. लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज सायन मुंबई, २) शेखर राय उर्फ चंन्द्रशेखर आत्राम रा. सेमीनरी हिल्स नागपुर, ३) राजेश गुहा रा. सेक्टर २० खारघर नवी मुंबई, ४) डॉ. राकेश वर्मा याचा चपरासी रा. लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज सायन मुंबई हयांनी संगणमत करून फिर्यादी हरिष  तिवाडे यांचा विश्वास संपादन करून फिर्यादी यांची मुलगी हिचा सरकारी कोट्यातुन वैद्यकीय एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी अँडमिशन करून देतो असे खोटे सांगुन फसवणुक करण्याचा उद्देशाने फिर्यादी कडुन वेळोवेळी अँडमिशन करिता ११,०९,२०० (अकरा लाख नऊ हजार दोनसे रुपये) घेऊन फसवणुक केल्याचे लक्षात येताच फिर्यादी हरिष तिवाडे यांनी कन्हान पोस्टे ला तक्रार दाखल केल्याने कन्हान पोलीसांनी सदर प्रकरणाचा तपास करित चारही आरोपी विरुद्ध कलम ४२०, ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीचा शोध घेणे सुरु आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात पोउपनि जावेद शेख हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

नयाकुंड मोड (दुर्घटना पाइंट)वर पुन्हा दोन ट्रक मध्ये धडक,दोन्ही ट्रक चालक जबर जख्मी

Tue Jun 15 , 2021
*नयाकुंड मोड (दुर्घटना पाइंट)वर पुन्हा दोन ट्रक मध्ये धडक,दोन्ही ट्रक चालक जबर जख्मी* *पारशिवनी* (ता प्र):-पारशिवनी पोलिस स्टेशन हदीतील नयाकुंड मोड वरून पाराशिवनी वरुन आमडी कडे जाणारा ट्रक क्रमाक u p 36 B T 5117 हा ट्रक पाराशिवनी वरुन आमडी कडे आपले साईट ने जात होता.विरुध दिशेने येणारा ट्रक क्रमाक […]

You May Like

Archives

Categories

Meta