
खापा : शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खापा शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने स्वाभिमान सप्ताह निमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेस खापा शहर अध्यक्ष सौ विद्याताई तुमाने यांच्या हस्ते “ज्ञानदायिनी गौरव” पुरस्कार हा महिला शिक्षका सौ.अर्चनाताई संजयराव भेलकर जवाहर हाईस्कूल व कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय, खापा यांना प्रदान करण्यात आला.
त्या निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खापा शहर अध्यक्ष राजेश बावणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष मकसुद शेख, अल्पसंख्याक अध्यक्ष फिरोज शेख व श्री विठ्ठलराव कोल्हे सर यांच्या प्रमुख उपस्थितित व राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सौ अर्चना ताई विनोद हरडे यांच्या मार्गदर्शनाखाली “ज्ञानदायिनी गौरव” पुरस्कार हा सन्मान सोहळा पार पडला.
यावेळी मीडिया सेल अध्यक्ष आकाश बारापात्रे, विधार्थी अध्यक्ष कपिल देशमुख, ललिता दुर्गे , सत्यभामा तुमाने, संगीता कोल्हे, राजेश्वरी बावणे, दीपाली बावणे,जाने मॅडम, सोमकुवार मॅडम, बोनकिले मॅडम, उमरकरसर, चोपडे सर,अशोक बारापात्रे, योगेश पराते, मनोज शेंडे, सचिन तुमाने, प्रवीण बावणे, कुणाल नगराळे, मोरेश्वर कवडे,जाहिद शेख, चरण गजबे, जयंत सोनकुसळे, मुरलीधर पाहूणे, निहार बोकडे, ईत्यादी असंख्य कार्यकर्ते व सन्माननिय नागरिक उपस्थित होते.