कन्हान शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडून शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला

कन्हान शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडून शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

कन्हान :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागपूर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष चन्द्रशेखर भिमटे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्य विविध कार्यक्रमासह साजरा करण्यात आला.
यावेळी शेकडो कार्यकर्ते कर्त्याची उपस्थित शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रशेखर भिमटे यांच्या हस्ते केक कापून कार्यक्रमाला सुरुवात केली,या कार्यक्रमात प्रामुख्याने रिपाई ज्येष्ठ नेते व भारतीय बौद्ध महासभेचे नेते सिद्धार्थ कांबळे, भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास बोरकर, रामटेक विधानसभा चे कार्याध्यक्ष अशोक पाटील, तालुका अध्यक्ष सचिन आमले, मिडिया सेल जिला महासचिव रोहित मानवटकर यांच्या उपस्थितीत मास्क वाटप, व बुंदी वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन अशोक पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष, व रा.का.पा.नागपूर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर भिमटे यांनी शरच्चंद्र पवार यांच्या राजकीय चळवळीची माहिती दिली व सर्व कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी कोणत्याही प्रकाराचे भेदभाव हवे दावे न ठेवता एक संघ रित्या पक्षाचे संघटन मजबूत करण्याच साठी काम करावे पक्ष तुमच्यासोबत आहे. असे मोलाचे मार्गदर्शन केले व सर्वांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.


रामटेक विधानसभा सचिव संगीत भारती,तालुका कार्याध्यक्ष दीप्ती समरीत,तालुका अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग मोरेश्वर खडसे , कन्हान शहर महासचिव नरेश सोनेकर ,कांद्री शहर महासचिव केशव विश्वकर्मा, कुणाल वर्मा ,लोंढेे, देवेंद्र खडसे, दिनेश पुरवले ,लखन पुरवले, राज शेंडे , प्रणय गोमासे.अरविंद ,कढारे, कळमकर , प्रियंकाा आखरे,प्रभा भुते, अनितााा मेश्राम इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होोतेे.

त्याच प्रमाणे कांद्री शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागपूर ग्रामीण महिला जिल्हा उपाध्यक्ष शशिकला बागडे यांच्या अध्यक्षतेखाली शरच्चंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमात बुंदी व मास्क वाटपाचे कार्यक्रम करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित कांद्री शहराध्यक्ष योगेश पोटभरे , पारशिवनी तालुका महासचिव योगेश बेलेकर , प्रकाश वरखडे, शंकर वाहने सहित पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होतेे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

टेकाडी गावात अज्ञात चोरट्यांनी केली पाच लाखाची घरफोडी

Wed Dec 15 , 2021
टेकाडी गावात अज्ञात चोरट्यांनी केली पाच लाखाची घरफोडी कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी खोरे ले आऊट शिवारात अज्ञात चोरट्यांनी घरी कोणी नसल्या ने घराचे कुलुप तोडुन घरफोडी करून एकुण ५ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याने घर मालकांच्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल […]

You May Like

Archives

Categories

Meta