टेकाडी गावात अज्ञात चोरट्यांनी केली पाच लाखाची घरफोडी

टेकाडी गावात अज्ञात चोरट्यांनी केली पाच लाखाची घरफोडी

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी खोरे ले आऊट शिवारात अज्ञात चोरट्यांनी घरी कोणी नसल्या ने घराचे कुलुप तोडुन घरफोडी करून एकुण ५ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याने घर मालकांच्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
पोलीस सुत्रा कडुन प्राप्त माहितीनुसार बुधवार (दि.८) डिसेंबर २०२१ ला राहुल राजकुमार सिंग वय २६ वर्ष राह खोरे लेआऊट प्लाॅट नंबर १२ टेकाडी (कन्हान) हे आपल्या मित्राचा लग्नाकरिता भरतपुर (राजस्थान) येथे गेला होता. त्यानंतर राहुल सिंग यांचे आई वडील सुध्दा राहुल सिंग च्या मावशीच्या मुलाच्या लग्नाकरिता शुक्रवार (दि.१०) डिसेंबर ला सकाळी ६ वाजता कुलुप लावुन जमुई (बिहार) येथे गेले होते. राहुल सिंग हा भरतपुर (राजस्थान) येथे असतांना मंगळवार (दि.१४) डिसेंबर २०२१ ला सकाळी ६ वाज ता दरम्यान घरासमोर राहणारा राहुल यादव यांनी फोन करून सांगितले कि, तुम्ही घरी येवुन जा तुम्हच्या घराचा समोरचा गेट उघडे असुन दाराचे कुलुप तुटले ले आहे. सांगितल्याने राहुल सिंग भरतपुर (राजस्थान) येथुन दिल्लीला गेले व विमानाने नागपुर येथे येऊन टेकाडी कन्हान येथे सायंकाळी ६ वाजता पोहचले असता घराच्या दाराची कुंडी तुटलेली दिसली. घराच्या आत गेले असता घरातील सामान अस्थवस्थ दिसुन घरातील लाकडी आलमारी व लोखंडी आलमारी खुली व तुटलेली दिसली. त्यात ठेवलेले सोन्याचे दागिने १) मंगलसूत्र हार १९.८०० ग्रँम २) अंगुठी ३.६५० ग्रँम ३) लाकेट ४.८५० ग्रँम ४) टाॅप जोडी ४.११० ग्रँम ५) जेंस्ट अंगुठी ३.८८० ग्रँम ६) लेडीज अंगुठी ३.२१० ग्रँम ७) ओम लाकेट १.०७० ग्रँम ८) चैन ११.२७० ग्रँम ९) अंगुठी ३.४७० ग्रँम १०) कानसुई धाग टाॅप ३.६३० ग्रँम ११) टाॅप जोडी ३.१३० ग्रँम १२) जेंस्ट अंगुठी २.५१० ग्रँम १३) कान बाली २.३०० ग्रँम १४) अंगुठी २.४३० ग्रँम १५) ठोसर ०.२९० ग्रँम १६) चैन ३.७४० ग्रँम १७) अंगुठी ३.०३० ग्रँम १८) लॉकेट ३.८३० ग्रँम १९) बाली २.३०० ग्रँम २०) चैन ८३० ग्रँम २१) अंगुठी १.८७० ग्रँम २२) झुमका ७.७०० ग्रँम २३) अंगुठी ३.०० ग्रँम २४) मनचली सात नग ६.६०० ग्रँम २५) टाॅप जोडी २७.०० ग्रँम २६) टाॅप ४.२०० ग्रँम २७) गौप लॉकेट १८.६५० ग्रँम २८) टाॅप जोडी १३ ग्रँम २९) ठोसर ३.९३० ग्रँम ३०) ठोसर ०.१८ ग्रँम असा एकुण १९ .२१ तोळे सोन्याचे दागिने एकुण ४,८०००० रूपये तसेच चांदिचे १) चांदी शिक्का ६.५०० ग्रँम २) कटोरा ४५.६२० ग्रँम ३) पायाल ४६ ग्रँम ४) सिंदुरदानी २५.०० ग्रँम ५) शिक्का १० ग्रँम ६) पायाल १०१ ग्रँम ७) चांदी बर्तन २८३.०० ग्रँम ८) चांदी सामान २८२.५० ग्रँम ९) बिझिया ४.५८० ग्रँम १०) पायाल ६१.६०० ग्रँम ११) पायाल ४६.०० ग्रँम १२) पायाल १०० ग्रँम १३) पायाल २९.५०० ग्रँम १४) पायाल १७७.१५ ग्रँम १५) दिया २ नग ३८.८०० ग्रँम असा एकुण १२५७ ग्रँम चांदीचे दागिने किंमत एकुण ३८,००० रूपये व नगदी ६५,००० रूपये आणि वडि लांना रिटायरमेंट चा वेळी मिळालेली टायटन कंपनीची घडी किंमत ५००० रूपये असा एकुण ५,८८,००० रू. (पाच लाख अठ्ठयाशी हजार रुपये) चा मुद्देमाल कोणी तरी अज्ञात चोराने चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी राहुल राजकुमार सिंग यांच्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्र ४५६/२०२१ कलम ४५४, ४५७, ३८० भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोस्टे चे सपोनि अमितकुमार आत्राम हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

कोळसा चोरून ट्रक मध्ये भरून पळालेल्या आरोपी व ट्रक चालका विरूध्द गुन्हा दाखल ; अवैद्य कोळसा चोरीवर अंकुश कोण लावेल ?

Wed Dec 15 , 2021
कोळसा चोरून ट्रक मध्ये भरून पळालेल्या आरोपी व ट्रक चालका विरूध्द गुन्हा दाखल #) अवैद्य कोळसा चोरीवर अंकुश कोण लावेल ? कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत वेकोलि इंदर खुली कोळसा खदान चा कोळसा चोरून अवैद्यरित्या ट्रक मध्ये भरून पसार झालेल्या दोन आरोपी विरूध्द वेकोली सुरक्षा अधिकारी यांचे तक्रारीवरून कन्हान […]

You May Like

Archives

Categories

Meta