बाबू एल. एन. हरदास यांची स्मुर्ती निमित्य अभिवादन
कन्हान ता.13
सत्य शोधक संघ तर्फे जय भीम घोष वाक्य जनक, सीपी बेरारचे त्याकाळी आमदार, कामगार नेते बाबू एल. एन. हरदास यांची स्मुर्ती निमित्य दि.12 जानेवारी रोजी नगर परिषद कन्हान परिसरात अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी सतीश भसारकर यांनी जिवनावर प्रकाश टाकत जनकल्याणकारी माहिती अवगत केली, स्वातंत्र्य पूर्वी दलित, शोषित्यांचे पुढारी, समाजसुधारक, राजकारणी तर कामगारांचे नेते म्हणुन बाबु एल.एन.हरदास प्रसिद्ध होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापित केलेले स्वतंत्र मजदूर पक्ष मध्ये प्रांताचे सरचिटणीस होते. त्यांनी त्या कठीण काळात शोषितांना न्याय मिळवून देण्यास अपार योगदान केले. गोलमेज परिषद इंगलन्ड मध्ये अस्पृश्य याचे नेते गांधी नाहीत तर डॉ.बाबासाहेब भीमराव आंबेडकर आहेत या करिता कित्येक टेलिग्राम केले आणी खरी ती ओळख दिली. अशा या धावपडीत त्यांनी स्वतःला न जपता अवघ्या 35 व्या वर्षी 12 जानेवारी 1939 दीर्घ आजाराने मृत्यु झाल्याचे सांगीतले . यावेळी कार्यक्रमाला मनीष भिवगडे नगरसेवक ,राजू शेंद्रे नगरसेवक , सतिश भसारकर, रजनीश मेश्राम, अशोक नारनवरे, शैलेश माटे, शक्ति पात्रे, शरद वाटकर, दीपक कुंभारे, चंदन मेश्राम, शेषराव बावणे, प्रशांत रामटेके, बाळा मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते .