प्रतिबंधित नायलॉन मांजा विकणारे वर कारवाही

प्रतिबंधित नायलॉन मांजा विकणारे वर कारवाही

सावनेर : पोलीस चौकी पाटणसांवगी येथिल पोलीस हवालदार रविन्द्र चटप सोबत पोलीस शिपाई रंजन कांबळे पाटणसांवगी परिसरात नितीन उर्फे अतुल विठ्ल शंभे रा. वार्ड क्र.५ पाटणसांवगी ता. सावनेर हा आपले बाजार चौक पाटणसांवगी येथिल नितीन जनरल स्टोर्स नावाचे दुकानात नायलॉन मांजा बाळगुन त्याची लपुन-छपुन विकी करित आहे अशा माहीती वरून पोलीस स्टॉफ सह दुकानाची खात्री करून दुकानासमोर जावुन रेड करून दुकानाची झडती घेतली असता लहान मोठया पतंगी तसेच सामान ठेवण्याच्या रॅक मध्ये प्लॉस्टीक पिशवीमध्ये एक नग मोठी चकी किंमती १५०० /- रू.दोन नग लहान चकी प्रत्येकी १०००/- रू.प्रमाणे एकुण किंमती २०००/-रू.व १२ गुंजी प्रत्येकी ५० /- रू.प्रमाणे एकुण किंमती ६००/- रू. असा एकुण ४१००/- रू चा महाराष्ट राज्यात प्रतिबंधित केलेल्या व चकीवर लेबल नसलेला नायलॉन मांजा मिळुन आल्याने गुन्हा नोद करण्यात आला आहे.

सदरची कारवाही मा. पोलीस अधिक्षक श्री हर्ष पोदार सा.व मा अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. संदिप पखाले साकृ, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी सावनेर श्री अनिल मस्के सा. (भा.पो.से.) यांचे मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक रविन्द्र मानकर यांचे नेतृत्वाखाली स.पो.नि.शिवाजी नागवे, पो.हवा. रविन्द्र चटप बपो. ना.रंजन कांबळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

न पचणाऱ्यांना जास्त दिलं म्हणुन पचलं नाही - किशोरीताई पेडणेकर कन्हान शहरा मधून स्त्री शक्ती संवाद यात्रेचा शुभारंभ

Wed Jan 17 , 2024
न पचणाऱ्यांना जास्त दिलं म्हणुन पचलं नाही – किशोरीताई पेडणेकर कन्हान शहरा मधून स्त्री शक्ती संवाद यात्रेचा शुभारंभ कन्हान, ता.१७ जानेवारी     शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या व माजी महापौर किशोरीताई पेडणेकर या स्त्री शक्ती संवाद यात्रा निमित्त विदर्भ दौऱ्यावर असतांना रामटेक विधानसभेचे प्रवेश व्दार कन्हान येथुन स्त्री […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta