कन्हान येथे काॅंग्रेस च्या पदाधिका-यांनी महागाई विरोधात काढली दुचाकीची मैय्यत

कन्हान येथे काॅंग्रेस च्या पदाधिका-यांनी महागाई विरोधात काढली दुचाकीची मैय्यत

#) मोदी सरकार विरोधात जोरदार विरोध प्रदर्शन करित महागाई दरवाढ कमी करण्याची मागणी.  


कन्हान : – केंन्द्र सरकार ने पेट्रोल, डिझल, गॅस सिलेंड र व इतर वस्तुच्या केलेल्या प्रचंड दरवाढीच्या विरोधात कन्हान येथे युवक काॅंग्रेस पार्टी पदाधिका-यांनी आंबेड कर चौक कन्हान येथुन दुचाकी मोटार सायकलची मैय्यत रैली काढुन मोदी सरकार च्या विरोधात जोरदार विरोध प्रदर्शन करित महागाई दरवाढ कमी करण्याची मागणी केली आहे.

        बुधवार (दि.१४) जुलै २०२१ ला महाराष्ट्र प्रदेश युवक काॅंग्रेस अध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांच्या आदे शानुसार महासचिव महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस पार्टीचे  मा. श्री. श्रिनावस नालमवार, नागपुर जिल्हा ग्रामीण युवक काॅंग्रेस अध्यक्ष श्री. राहुल सीरिया यांच्या मार्गदर्शनात रामटेक विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष निखिल पाटील, कन्हान शहर अध्यक्ष राजा यादव, नागपूर जि ल्हा ग्रामीण युवक काँग्रेस महासचिव आकिब सिद्धिकी, पारशिवनी तालुका युवक काँग्रेस महासचिव साहिल गजभिये आदी च्या नेतृत्त्वात पेट्रोल, डिझल, गॅस सिलेंडर दरवाढ वाढती महंगाई च्या विरोधात मोदी सरकार च्या निषेर्धात रामटेक विधानसभा युवक काॅंग्रेस, पारशिवनी तालुका युवक काॅंग्रेस, कन्हान शह र युवक काॅंग्रेस च्या पदाधिका-यांनी आंबेडकर चौक ते तारसा चौक पर्यंत स्वाक्षरी अभियान व दुचाकी मोटार सायकल ची मैय्यत रैली काढुन मोदी सरकार च्या पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढी विरोधात जोरदार प्रदर्शन करित महंगाई दरवाढ कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी रोहित बर्वे, कृष्णाजी नाखले, अनस शेख, शांतनु राउत, हसन शेख, नरेश आरबी, बाबु कुरेशी, महेश धोगडे सह कार्यकर्ते बहु संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्र येथे न्युमोकोकल काॅन्जुगेट वैक्सीन चा शुभारंभ   

Fri Jul 16 , 2021
कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्र येथे न्युमोकोकल काॅन्जुगेट वैक्सीन चा शुभारंभ  कन्हान : – नागरिकांनी आपल्या लहान बाळांना न्युमो कोकल आजारापासुन सुरक्षित ठेवण्याकरिता सार्वत्रि क लसीकरण मोहिमेत न्युमोकोकल काॅन्जुगेट वैक्सी न पीसीव्ही लस चा कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्रात  जिल्हास्तरीय मोहीमचे उद्घाटन जि प नागपुर अध्यक्षा सौ रश्मी बर्वे यांच्या हस्ते शुभारंभ करून जिल्हयाती ल […]

You May Like

Archives

Categories

Meta