पांडुर्णा ते नागपूर हायवे क्र . 47 वरील मौजा बिहाडा फाटा येथे गौवंश जनावरांची कत्तली करीता वाहतुक करणा – या आरोपीतावर कायदेशीर कार्यवाही केली

पांडुर्णा ते नागपूर हायवे क्र . 47 वरील मौजा बिहाडा फाटा येथे गौवंश जनावरांची कत्तली करीता वाहतुक करणा – या आरोपीतावर कायदेशीर कार्यवाही केली.

सावनेर : दिनांक 13/08/2022 रोजी रात्री 22/00 वा . सपोनि अमितकुमार आत्राम ठाणेदार पो.स्टे . केळवद , पोहवा रविद्र डोरले , नापोशी रविद्र चटप , पोशी धोंडुतात्या देवकते , पोशी सचिन येळकर , पोशी पंकज कोवाड, नापोशी गुणवंत्ता डाखोळे चे सह शासकीय वाहनाने पो.स्टे . परीसरात पेट्रोलिंग दरम्यान मुखबिराद्वारे मिळालेल्या माहिती वरुन आयसर गाडी क्र . एम एच 40 सि.डी. 8702 या वाहनास नाकाबंदी करुन चेक केले असता आयसर गाडी क्र. एम एच 40 सि.डी. 8702 चा चालक शेख अनिस शेख शबिर वय 27 वर्ष रा . पानी टक्की के पास परासिया नाका के पास हाऊसिंग बोर्ड कॉलनि छिदवाडा जि . जि.छिन्दावाडा ( मप्र ) व त्याचे दोन साथीदार नामे मोहम्मद ईसा शेख अक्रम शेख वय 22 वर्ष रा . वार्ड क्र . 37 हमसफर ब्युटी पालर के पास दिवांची पुरा छिन्दवाडा जि . छिन्दावाडा ( मप्र ) धंदा कन्डक्टर शिवगिरी गोपालगिरी गोस्वामी वय 29 वर्ष रा . वार्ड क्र . 19 ग्राम जमुनिया पोस्ट जमुनिया ता . छिन्दवाडा जि.छिन्दावाडा ( मप्र ) यांनी स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी महाराष्ट्र राज्यात गौवंश हत्या बंदी असतांना आयसर गाडी क्र . एम एच 40 सि.डी. 8702 किमती 22,00,000 / रुपये मध्ये 18 नग म्हशी प्रत्येकी किमती 30,000 / – रुपये प्रमाने एकुण किमती 5,40,000 / -रुपये . 1 नग मृत म्हैस किमती 00 / -रुपये .1 नग मृत हेला किमती 00 / – रुपये ( गौ शाळेत दाखल ) असा एकुन 27,40,000 / – रुपया चा माल अत्यंत क्रुर व निर्दयतेने डांबुन आखुळ दोरीने बांधुन त्यांना चारा पाणी न देता कोबुंन दाटीवीटीने अपुऱ्या जागेत ठेवुन कत्तलीसाठी घेवून जातांना वाहतुक करतांना मिळुन आल्याने सदर म्हशींना पुढील देखभाल व उपचार कामी गौशालेत दाखल करुन वरील आरोपीता विरुद्ध क कलम 279 , 429 , 34 भादवी सह कलम 11 ( 1 ) ( घ ) ( ड ) ( च ) प्राण्यांना निर्दयतेने वागणुक प्रतीबंधक अधि . 1960 सह कलम 5 ( अ ) , 9 महाराष्ट्र प्राणी सरंक्षण अधिनीयम 1995 सह कलम 119 महाराष्ट्र पोलीस अधिनीयम 1951 सहकलम 192 ( अ ) , 179 , 184 मो वा का अन्वये गुन्हा दाखल करुन तिन्ही आरोपीतांना अटक करण्यात आली आहे . सदरची कार्यवाही ही विजयकुमार मगर , पोलीस अधिक्षक नागपूर ग्रा . , राहुल माकणीकर अपर पोलीस अधिक्षक नागपूर ग्रा . , अजय चांदखेडे उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर यांचे मार्गदर्शनाखाली वरिल टिम ने केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

टेकाडी येथे दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा हस्ते ध्वजारोहण

Wed Aug 17 , 2022
  टेकाडी येथे दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा हस्ते ध्वजारोहण कन्हान, ता.15 ऑगस्ट       75 व्या गणतंत्र दिवसानिमित्त गेल्या तीन दिवसापासून अमृत महोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जात होता. यामध्ये समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित ‘राजे फाउंडेशन कन्हान’ यांच्यामार्फत तिरंगा रॅली व झेंडावंदन घेण्यात आले. […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta