आरोपी जवळुन बनावटी मॉऊझर किंमत ४० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

स्थागुअ शाखा पथकाने बनावटी मॉऊझर आरोपी च्या घरून केली जप्त

#) आरोपी जवळुन बनावटी मॉऊझर किंमत ४० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत कन्हान उपविभागात ऑपरेशन ऑल आऊट मोहीम राबवित शिवाजी नगर कन्हान येथील शाहरुख खान व त्यांच्या घराची झडती घेत एक देशी बनावटीची माऊझर किमत ४० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध कन्हान पोस्टे ला गुन्हा नोंद करून पुढील कारवाई करिता कन्हान पोलीसाच्या स्वाधिन करण्यात आले.
पोलीस सुत्राकडुन प्राप्त माहितीनुसार मंगळवार (दि.१४) डिसेंबर ला पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामिण मा विजयकुमार मगर यांच्या आदेशानुसार स्थागुअ शाखा नागपुर पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हेशाखा नागपुर ग्रामिण पथकाने कन्हान उपविभागात ऑपरेशन ऑल आऊट मोहीम राबवित असताना खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की, शिवाजी नगर कन्हान येथील शाहरुख खान नावाचा इसम आपले ताब्यात देशी बना वटीचे लोखंडी माऊझर बाळगुन आहे. अशी माहिती प्राप्त झाल्यावरून त्याची व त्याच्या घराची झडती घेत ली असता घर झडती मध्ये एक देशी बनावटीची माऊ झर किमत ४० हजार रूपयाची मिळुन आल्याने आरोपी विरुद्ध कलम ३, २५ भा ह का अन्वये कारवाई करून कन्हान पोस्टे ला गुन्हा नोंद करित पुढील कारवाई करण्याकरिता कन्हान पोलीसाच्या स्वाधिन करण्यात आले. सदर कार्यवाही स्थानिक गुन्हे अन्वेशन नागपुर ग्रामिण सपोनि अनिल राऊत, पोहवा. विनोद काळे, ज्ञानेश्वर राऊत, अरविंद भगत, पोलीस नाईक शैलेश यादव, पोशि. वीरेंद्र नरड, चालक सफौ साहेबराव बहाळे आदीनी यशस्विरित्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

रा काँ रामटेक विधानसभा द्वारे रोग निदान शिबीराने पवार साहेबांचा वाढदिवस साजरा

Thu Dec 16 , 2021
रा काँ रामटेक विधानसभा द्वारे रोग निदान शिबीराने पवार साहेबांचा वाढदिवस साजरा #) आरोग्य व निःशुल्क मुळव्याध तपासणी शिबीरा चा ५५ नागरिकांनी घेतला लाभ. कन्हान : – राष्ट्रवादी काँग्रेस रामटेक विधानसभा द्वारे समाज भवन हनुमान नगर कन्हान येथे आरोग्य व निःशुल्क मुळव्याध तपासणी शिबीराने मा. शरदचंद्र पवार साहेबाचा वाढदिवस साजरा […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta