रा काँ रामटेक विधानसभा द्वारे रोग निदान शिबीराने पवार साहेबांचा वाढदिवस साजरा

रा काँ रामटेक विधानसभा द्वारे रोग निदान शिबीराने पवार साहेबांचा वाढदिवस साजरा

#) आरोग्य व निःशुल्क मुळव्याध तपासणी शिबीरा चा ५५ नागरिकांनी घेतला लाभ.

कन्हान : – राष्ट्रवादी काँग्रेस रामटेक विधानसभा द्वारे समाज भवन हनुमान नगर कन्हान येथे आरोग्य व निःशुल्क मुळव्याध तपासणी शिबीराने मा. शरदचंद्र पवार साहेबाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. परिसरातील ५५ नागरिकांनी शिबीराचा लाभ घेतला.
रविवार (दि.१२) डिसेंबर २०२१ ला समाजभवन हनुमान नगर कन्हान येथे राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी रामटेक विधानसभा, पारशिवनी तालुका व कन्हान शहर द्वारे आरोग्य व निशुल्क मुुळव्याध तपासणी शिबिराचे राकॉ रामटेक विधानसभा अध्यक्ष किशोर बेलसरे,नागपुर जिला उपाध्यक्ष गणेश पाणतावने, कन्हान-पिपरी नगराध्यक्षा करूणाताई आष्टनकर, डॉ सत्यम सुपारे, कन्हान पोस्टे चे पो उप निरीक्षक महादेव सुरजुसे, महा वितरण उपकार्यकारी अभियंता अनंत भगत, किसान काँग्रेस नागपुर जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश काकडे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. राकॉ पदाधिकारी व कार्यकर्त्यानी छोटया मुलाच्या हस्ते केक कापुन राष्ट्रवादी कॉग्रेस चे सर्वेसर्वा मा. शारदचंद पवार साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

  या निमित्य आरोग्य व निशुल्क मुुळव्याध तपासणी शिबिराचा परिसरातील ५५ नागरिकांनी लाभ घेतला. याप्रसंगी राकॉ पारशिवनी तालुकाध्यक्ष पुरणदास तांडेकर, जिला महा सचिव श्रीराम नांदुरकर, रामटेक विधानसभा क्षेत्र युवक अध्यक्ष देवीदास तड़स, नागपुर जिला मिडिया सेल महासचिव रोहित मानवटकर, कन्हान शहराध्यक्ष अभिषेक बेलसरे, पारशिवनी तालुकाध्यक्ष सचिन आमले, कन्हान महिला उपाध्यक्ष माया भोयर, महिला जिल्हा महासचिव सुनीता मानकर, पारशिवनी शहर महिला अध्यक्ष नीताताई गोमकाडे, पारशिवनी शहरा ध्यक्ष प्रणव गोमासे, कन्हान शहर कार्याध्यक्ष कमलेश शर्मा, पारशिवनी मिडिया सेल अध्यक्ष शफीक शेफ, समाजसेवी दलजीत पात्रे, रामटेक विधानसभा क्षेत्र सचिव संगीत भारती, उपाध्यक्ष योगिता भलावी, कन्हान महासचिव दिवाकर इंगोले, समाजसेवी गणेश भालेकर, लोकेश डहाके, मनोज शेंडे, कन्हान उपाध्यक्ष विवेक अंबास्कर, कन्हान महिला उपाध्यक्ष सुनीता वैद्य, कन्हान उपाध्यक्ष अनील भालेकर, सुरज वरखेड़े, अमित बेलसरे, सुरज प्रसाद सह राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी चे कार्यकर्ते व पदाधिकारी बहु संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता आनंद (सतीश) किशोर बेलसरे व मित्रानी सहकार्य केले.

कन्हान शहरात राष्ट्रवादी काँग्रेस व्दारे मा. शरदचंद्र पवार साहेबांचा वाढदिवस साजरा

कन्हान : – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे राष्ट्रवादी काँग्रेस व्दारे विविध कार्यक्रमाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरदचंद्र पवार साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
रविवार (दि.१२) डिसेंबर २०२१ ला डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे राकॉ नागपुर जिल्हा उपाध्यक्ष चन्द्रशेखर भिमटे यांचे हस्ते केक कापुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी प्रामुख्याने रिपाई ज्येष्ठ व भारतीय बौद्ध महासभेचे नेते सिद्धार्थ कांबळे, भीमशक्ती जिल्हाध्यक्ष कैलास बोरकर, रामटेक विधानसभा कार्याध्यक्ष अशोक पाटील, तालुकाध्यक्ष सचिन आमले, मिडिया सेल जिला महा सचिव रोहित मानवटकर आदी च्या उपस्थितीत मास्क वाटप, व बुंदी वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन अशोक पाटील यांनी केले. कार्यक्रमास रामटेक विधानसभा सचिव संगीत भारती, तालुका कार्याध्यक्ष दीप्ती समरीत, तालुकाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग मोरेश्वर खडसे, कन्हान शहर महासचिव नरेश सोनेकर ,कांद्री शहर महासचिव केशव विश्वकर्मा, कुणाल वर्मा, लोंढेे, देवेंद्र खडसे, दिनेश पुरवले, लखन पुरवले, राज शेंडे, प्रणय गोमासे, अरविंद कढारे, कळमकर, प्रियंका आखरे, प्रभा भुते, अनिता मेश्राम आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थितीत होतेे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

शिक्षकांचे प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातून एकाचवेळी निवेदन

Fri Dec 17 , 2021
शिक्षकांचे प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातून एकाचवेळी निवेदन कन्हान: प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघातर्फे राज्यभर एकाचवेळी तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री,शिक्षण मंत्री व ग्राम विकास मंत्र्यांना निवेदन सादर केले जाणार आहे.यानंतर पुढील टप्प्यात सर्व जिल्ह्य़ात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व त्यानंतर मुंबई येथे संघटनेतर्फे धरणे आंदोलन करण्यात […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta