कन्हान ला ११ कोरोना संक्रमित रूग्ण : कोरोना अपडेट

कन्हान ला ११ कोरोना संक्रमित रूग्ण

#) तिस-या लाटेची चाहुल ६६ कोरोना रूग्ण होम कोरंटाईन असुन कन्हान परिसराची एकुण ९६ रूग्ण.

कन्हान : – कोरोना तिसरी लाट सुरू होत दिवसे दिवस कोरोना रूग्ण वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान च्या ३९ तपासणी कन्हान चे १२ रूग्ण कोरोना संक्रमित रूग्ण आढळुन आता पर्यंत ९६ रूग्ण संख्या झाली असुन सध्या ६६ रूग्णाना होम क्वोरंटाईन करण्यात आले आहे.
कोरोना तिस-या लाटे ची सुरूवात भासत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे शनिवार (दि.१५) जानेवारी च्या आलेल्या ३९ तपासणी अहवालात ११ रूग्ण कोरोना संक्रमित रूग्ण आढळुन एकुण ६६ रूग्णाना घरीच उपचार करण्यात येत असुन कन्हान परिसरात एकुण ९६ रूग्ण संख्या झाली आहे.


(दि.१) डिसेंबर २०२१ ला टेकाडी (को.ख) नविन वसाहत येथील कलकत्ता वरून आलेल्या तरूणाची प्रकृती बिघडल्याने नागपुर ला खाजगी रूग्णालयात दाखल केल्याने खाजगी तपासणीत तिस-या लाटेचा पहिला रूग्ण आढळुन आला. शनिवार (दि. १५) जानेवारी २०२२ पर्यंत ५५ कोरोना रूग्ण संक्र मित होते. रविवार (दि.१५) जानेवारी ला कन्हान केंद्रा तुन ११ रुग्ण. आता पर्यंत खाजगी तपासणीत २, प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान च्या तपासणीत ८५, प्राथमिक आरोग्य केंद्र साटक चे ८, कामठी – १ रूग्ण असे कन्हान परिसरात एकुण ९६ रूग्ण संख्या झाली असुन सध्या १५ रूग्ण दुरूस्त झाले तर ६६ रूग्ण होम कोरंटाईन करून उपचार करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

कन्हान परिसरात मास्क न घालण्याऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरु

Tue Jan 18 , 2022
कन्हान परिसरात मास्क न घालण्याऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरु #) १३५ विनामास्क १४ हजार ३०० रुपयाचा दंड वसुल, कन्हान नगरपरिषद, पोलीसांची कारवाई. कन्हान : – राज्यात पुन्हा कोरोना व ओमिक्राॅन चे रुग्ण झपाट्याने दिवसे दिवस वाढत असल्याने शासना ने नवीन नियमावली लागु करून पोलीस विभाग व संबंधित अधिका-यांना नियमाचे उल्लंघन करणाऱ्यां […]

You May Like

Archives

Categories

Meta