श्रीमती हिराबाई उच्च प्राथमिक शाळेत आधार कार्ड अपडेट शिबीर संपन्न

श्रीमती हिराबाई उच्च प्राथमिक शाळेत आधार कार्ड अपडेट शिबीर संपन्न

कन्हान, ता.१७

     विद्यार्थ्यांच्या स्टुडंट पोर्टलवरील अडचणी दुर करण्यासाठी श्रीमती हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान येथे दोन दिवस शिबीराचे आयोजन करून पंच्यात्तर विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट करण्यात आले.

‌ स्टुडंट पोर्टलवर विद्यार्थ्यांची नावे अपलोड करताना आधार कार्डशी जुळणारी समस्या दूर करण्यासाठी पारशिवनी तहसिलदार व गटशिक्षणाधिकारी यांच्या प्रयत्नाने (दि.१५) व (दि.१७) एप्रिल हे दोन दिवस श्रीमती हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान येथे आधार कार्ड अपडेट शिबिर संपन्न झाले. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी कन्हान सेतु केंद्राचे जागृती रामटेके, संदीप रामटेके व गौरव उताणे हे आधार कार्ड नोंदणी कर्मचारी शाळेत आल्यावर संचालक श्री. नरेंद्रजी वाघमारे, शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना रामापुरे, धर्मराज प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक खिमेश बडीये यांनी पुष्पगुच्छाने स्वागत करून आधारकार्ड अपडेट करणे सुरू करून दोन दिवसात शाळेतील एकुण ७५ विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षक हेमंत वंजारी, अभिषेक मोहनकर, भास्कर सातपुते, आयेशा अन्सारी, जयश्री पवार, कीर्ती वैरागी, गीता वंजारी आदीनी विद्यार्थ्यांना मदत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

भीमजयंती महोत्सव बुद्धीष्ट वेलफेअर सोसायटी व जयंती समिती व्दारे थाटात

Mon Apr 17 , 2023
भीमजयंती महोत्सव बुद्धीष्ट वेलफेअर सोसायटी व जयंती समिती व्दारे थाटात कन्हान : – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती महोत्सव बुद्धीष्ट वेलफेअर सोसायटी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती कन्हा न यांच्या सयुक्त विद्यमाने भीमगीत, केक व फटाक्यां ची आतिष बाजी, माल्यार्पण, भव्य रोग निदान शिबीर, भोजनदान आणि […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta