राष्ट्रमाता जिजाऊ स्मृती दिनी जिजाऊ ब्रिगेड व बार्टी समतादुत व्दारे वृक्षरोपन

राष्ट्रमाता जिजाऊ स्मृती दिनी जिजाऊ ब्रिगेड व बार्टी समतादुत व्दारे वृक्षरोपन

कन्हान : – जिजाऊ ब्रिगेड कन्हान व डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या समतादुत प्रकल्पा अंतर्गत राजीव गांधी बालोद्यान व सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान येथे जिजाऊ ब्रिगेड व समतादुत च्या सयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता जिजाऊ स्मृती दिनी अभिवादन करून वृक्षरोपण करण्यात आले.  


          गुरूवार दि.१७ जुन २०२१ ला राजमाता, राष्ट्र माता जिजाऊ स्मृती दिनी जिजाऊ ब्रिगेड कन्हान व  डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या समतादुत शुभांगी टिंगणे यांच्या सयुक्त विद्यमाने सार्वजनिक वाचनालय व राजीव गांधी बालो द्यान हनुमान नगर कन्हान येथे राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेबाना अभिवादन करून नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर, जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा मायाताई इंगोले, बार्टी समतादुत शुभांगी टिंगणे यांच्या हस्ते वृक्षरोपन करण्यात आले. यावेळी मानवाची सेवा करण्यात निसर्गातील वृक्षाचा फार मोठा वाटा म्हणजे वृक्ष आप णास ऑक्सीजन पुरवठा करून आपले अस्तिव सुर क्षित करण्यास संजीवनी प्रदान करतात म्हणुन वृक्षरो पन करून संवर्धनाची गरज आहे.असे जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा मायाताई इंगोले हयानी तर नगराध्यक्षा आष्टणकर हयानी वृक्षाचे दैनदिनी जिवनात महत्व असुन वृक्ष आपल्याला सावली देतात, भुजल पातळी वाढवितात, निसर्गाचा समतोल राखण्यास सहकार्य करतात म्हणुनच ” वनश्री हीच धनश्री ” हा मुलमंत्र जपण्यास वृक्षरोपन व संवर्धन हे प्रत्येक नागरिकांचे आद्य कर्तव्य असले पाहीजे. असे मौलिक विचार व्यकत केले. याप्रसंगी सार्वजनिक वाचनालय सचिव मनोहराव कोल्हे, अनिल आष्टणकर, जिजाऊ ब्रिगेड च्या छायाताई नाईक, अल्काताई कोल्हे, शितल बांते, सुनिता ईखार, मिनल मडगे, संध्याताई सुर्यवंशी, सोनाली सुर्यवंशी, निधी ईखार प्रामुख्याने उपस्थित होत्या. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान शहरातील महामार्गाचे पथ दिवे नियमित सूरू करा

Fri Jun 18 , 2021
कन्हान शहरातील महामार्गाचे पथ दिवे नियमित सूरू करा #) नगरपरिषद मुख्याधिकारी बन्नोरे यांना शिवसेना शहर व़्दारे मागणी.  कन्हान : –   शिवसेना कन्हान शहर प्रमुख व शिव सैनिका व्दारे नगरपरिषद कन्हान पिपरी मुख्याधिका री गिरिष बन्नोरे यांना निवेदन देऊन शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील पथ दिवे लावुन नियमित लावण्याची मागणी करण्यात आली.    […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta