नागपूर जिल्ह्य़ात कोरोना सर्वेक्षक शिक्षकाचा पहिला बळी

*नागपूर जिल्ह्य़ात कोरोना सर्वेक्षक शिक्षकाचा पहिला बळी*

*कोरोना योध्दा अंतर्गत 50 लाखाची मदत द्या

*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाची विभागीय आयुक्तांकडे मागणी

* रामदास काकडे यांचे कोरोनाने निधन*

कन्हान : ता 17 संप्टेबर कोविड १९ सर्वेक्षणाच्या कामात असणाऱ्या शिक्षकांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. यातूनच श्री रामदास काकडे (वय ५१) या शिक्षकाचा पहिला बळी गेला. त्यामुळे काकडे कुटुंबियांना ५० लाखाची कोविड योध्दा अंतर्गत मदत द्यावी तसेच कार्यरत सर्वेक्षक शिक्षकांना ५० लाखाचे विमा संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघातर्फे शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे सरांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्या प्रमाणे, बालाजी हायस्कूल, हिंगणा रोड नागपूर येथील शिक्षक श्री रामदास काकडे यांची हिंगणा तहसील अंतर्गत कोविड १९ सर्वेक्षणाच्या कामात सेवा अधिग्रहित करण्यात आली होती. नागपूर जिल्हा प्रशासनाकडून सर्वेक्षणाच्या कामात असणाऱ्या शिक्षकांना कोणत्याही सुरक्षा पुरविण्यात आल्या नाहीत.
कोविड १९ कामात असणाऱ्या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करण्यात यावे, असे शालेय शिक्षण विभागाने १७ आॅगस्ट व शिक्षणाधिकारी (प्राथ) यांनी ३१ आॅगस्टच्या पत्रान्वये जिल्हाधिकारी नागपूर यांना कळविले होते. विदर्भ प्राथमिक शिक्षक संघातर्फे (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ) मुख्य सचिव, प्रधान सचिव (मदत व पुनर्वसन) व जिल्हाधिकारी नागपूर यांना ७ सप्टेंबर २०२० रोजी निवेदन देऊन कार्यमुक्त करण्याची मागणी केली होती. मात्र या मागणीकडे व शासन आदेशाकडे दुर्लक्ष करण्यात आले.
कोरोना योध्दा म्हणूनही शिक्षकांचा समावेश नाही तसेच ५० लाखाच्या विम्या संदर्भातही शासनाकडून स्पष्टता करण्यात आली नाही. अशा बिकट परिस्थितीत २० जुलै पासून नागपूर जिल्ह्य़ात व विभागात कोविड १९ सर्वेक्षणाच्या कामात मोठ्या प्रमाणात शिक्षक व्यस्त आहे. श्री रामदास काकडे सुध्दा या सर्वेक्षणात सहभागी असताना गेल्या आठ दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. या संदर्भात हिंगणा तहसील यंत्रणेला कळविले होते, मात्र काम करावेच लागेल असे फर्मान देण्यात आले. तब्येत बरी वाटत नसल्याने त्यांना लता मंगेशकर हाॅस्पीटल वानाडोंगरी हिंगणा येथे शनिवारी (ता १२) भर्ती करण्यात आले होते. यातच कोविड १९ मुळे प्रकृती चिंताजनक बनल्याने आज बुधवारी (ता 1६) पहाटे ३ ते ४ च्या दरम्यान त्यांचे निधन झाले.
कोरोना सर्वेक्षणाचा हा नागपूर जिल्ह्य़ातील पहिला बळी ठरला आहे. यामुळे तातडीने आज (ता १६) विदर्भ प्राथमिक शिक्षक संघातर्फे विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त (महसूल) सुधाकर तेलंग यांना निवेदन देऊन शिक्षक कोविड योध्दा अंतर्गत ५० लाखाची मदत करावी, कार्यरत सर्वेक्षक शिक्षकांचा ५० लाखाचा विमा जाहीर करावा, कोविड योध्दांना तातडीने वैद्यकीय औषधोपचार मिळावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी महसूल उपायुक्त श्री तेलंग यांनी मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येईल व इतर विषयांवर तातडीने सर्व जिल्हाधिकारी सोबत चर्चा करुन सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले.
जिल्हा प्रशासनाने कोविड 19 सर्वेक्षणाच्या कामातील शिक्षकांचा ५० लाखाचा विमा संरक्षण न दिल्यास शासन आदेशान्वये शिक्षकांना तातडीने कार्यमुक्त करावे अशीही मागणी करण्यात आली. हे निवेदन मुख्यमंत्री, अर्थमंत्री, शालेय शिक्षणमंत्री, जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांना सुद्धा देण्यात आले.
यावेळी शिक्षक नेते व संस्थापक अध्यक्ष श्री मिलिंद वानखेडे, नागपूर विभागीय सचिव खिमेश बढिये, माध्यमिक संघटक श्री शेषराव खार्डे, ग्रामीण जिल्हा संघटक श्री गणेश खोब्रागडे, हिंगणा तालुका संघटक श्री कुंदन भारसागडे, अपंग विभाग जिल्हा संघटक श्री दिनेश गेटमे, श्री संदिप गोलर, श्री प्रवीण साबळे, श्री अतुल रंगारी उपस्थित होते.

विदर्भ प्राथमिक शिक्षक संघातर्फे विभागीय उपायुक्त श्री तेलंग यांना निवेदन देतांना पदाधिकारी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

झाल झाल सोड आता मला,नको मारू माफ कर मला : कर्तव्यदक्ष शिपाईची हाक

Thu Sep 17 , 2020
*झाल झाल सोड आता मला,नको मारू माफ कर मला! * कर्तव्य दक्ष पोलिस शिपायावर वर प्राणघातक हल्ला * हल्ल्याने शहरात पुन्हा एकदा गुंडप्रवृतीने डोके वर काढल्याचे चित्र कन्हान ता.17 :कन्हान परिसरात गहूहिवरा चौक तारसा रोड येथे दि.16 सप्टेंबर रोजी बुधवार सांयकाळी नऊचा सुमारास पोलिस शिपायावर गुंडप्रवृतीचा युवकानी जुण्या वादाच्या सूड […]

You May Like

Archives

Categories

Meta