पेंच धरणांचे दरवाजे उघडल्याने नदीला पुर परिस्थितीने शेतीचे नुकसान पेंच व कन्हान नदीला पुर काही गावात पाणी शिरले, संपर्क तुटला

पेंच धरणांचे दरवाजे उघडल्याने नदीला पुर परिस्थितीने शेतीचे नुकसान

पेंच व कन्हान नदीला पुर काही गावात पाणी शिरले, संपर्क तुटला

कन्हान, ता.१६ सप्टेंबर

     तोतलाडोह चे १४ व नवेगाव खैरी धरणा चे १६ दरवाजे उघडुन पेंच नदी व्दारे कन्हान नदीत पाण्याचा विसर्ग सोडल्याने नदीचे दोन्ही किणारे भरून वाहुन पुरपरिस्थिती झाल्याने मेंहदी, वाघोडा, नांदगाव, घाटरोहना, जुनिकामठी, पिपरी, निलज, सिंगारदिप, बोरी गावात पाणी शिरून परिसरातील शेती मध्ये भरल्याने शेतपिकाचे नुकसान झाले असुन सर्तकेतेच्या इशा-यामुळे कुठलिही जिवहानी झाली नाही.

 

      मागील काही दिवसा पासुन पावसाने विश्राम घेतला होता. बुधवार रात्री पासुन मध्यप्रदेशात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. सतत होत असलेल्या पावसामुळे चौराई धरणाचे गेट उघडल्याने तोतलाडोह धरणातील जलसाठ्यात वाढ होत पेंच तोतलाडोह व नवेगाव खैरी धरण पूर्ण १००% भरलेले असुन तोतला डोह धरणाचे १४ पैकी १० दरवाजे ०.४ मी तर नवेगाव खैरी धरणाचे १६ दरवाजे पैकी १२ दरवाजे ०.५० मी ने तर ४ दरवाजे १.०० मी. ने उघडुन त्यामधुन १०५५ .०४० क्युमेक्स पाण्याचा विसर्ग पेंच नदीत सुरू होता. धरणाच्या सुरक्षेच्या दुष्टीने सायंकाळी ५.४५ वाजता नवेगाव धरणाचे ८ दरवाजे २ मी व ८ दरवाजे २.५० मी ने उघडुन त्यातुन ३४४८.१६० क्युमेक्स पाण्याचा विसर्ग पेंच, कन्हान नदीत सोडण्यात येत होता. करिता सोडणारा विसर्ग कमी जास्त करण्यात येऊ शकतो . असा पेंच उपविभागीय अभियंता व प्रशासनाने पेंच व कन्हान नदी काठा लगत आणि संबधित शेतकरी, नागरिकांना सावधतेचा इशारा देण्यात आला होता.

  (दि.१६) ला रात्री १२.३० वाजता नवेगाव खैरी धरणा चे १६ दरवाजे ३.५० मी. उघडुन ४९८५.१२ क्युमेक्स पेंच नदीत विसर्ग करण्यात आल्याने पुर परिस्थिती निर्माण झाली होती. सकाळी ६.३० वाजता धरणाचे ८ दरवाजे ३ मी व ८ दरवाजे ३.५० मी उघडुन ४६९९. ६८ क्युमेक्स विसर्ग आणि ११.१५ वाजता १६ दरवा जे २.५० मी उघडुन ३७७९.३६० क्युमेक्स पाण्याचा विसर्ग तर १२. ४५ वाजता १६ दरवाजे १.५० मी उघडुन २४२१.६० क्युमेक्स विसर्ग सुरू होता. कमी कमी करत नवेगाव खैरी धरणाचा जलसाठा ९२.४४ % झाल्याने कमी कमी करत सायंकाळी ४ वाजता ८ दरवाजे ०.५० मी व ८ दरवाजे १ मी. उघडुन १२५३. २८० क्युमेक्स पाण्याचा विसर्ग पेंच, कन्हान नदीत सुरू असल्याने नदीच्या पाण्याची पातळी सुध्दा कमी झाली आहे. या नवेगाव खैरी धरणातील पाण्याच्या विसर्गाने पुर परिस्थित निर्माण होऊन पेंच नदी काठा वरील मेंहदी, गवना, गरंडा, वाघोडा, नांदगाव, एंसबा, वराडा, घाटरोहना, जुनीकामठी, गाडेघाट, पिपरी, खंडाळा, निलज, बोरी, सिंगारदिप गावातील शेत शिवा रात पाणी साचुन शेत पिकांचे नुकसान झाले.

    तर नांदगाव, घाटरोहना, जुनीकामठी, पिपरी व सिंगारदिप गावात पुराचे पाणी शिरले होते.कन्हान नदीला पुर आल्याने कन्हान-पिपरी, गाडेघाट व जुनी कामठी गावातील संपर्क तुटला आहे. पूर परिस्थिति लक्षात घेऊन रामटेक उपविभागीय अधिकारी सौ.वंदना सावरंगपते , पारशिवनी तहसीलदार, महसुल विभाग, पटवारी, पोलीस व नगर परिषद प्रशासन व संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली असुन सध्या परिस्थिति नियंत्रणात आहे .

   शुक्रवार (दि.१५) ला सकाळी पर्यत पारशिवनी तालुकात एकुण ८५३.७५ मिमी पाऊत झाला. यात पारशिवनी मंडळात ६४.२ मिमि, कन्हान येथे ३४.० मि.मी., आमडी येथे ४७.१ मिमी तर नवेगाव खैरी येथे सर्वात जास्त म्हणजे ८१.० मिमी पाऊस झाला होता. आणि पाऊस सुरु असल्या ने पेंच व कन्हान नदी पात्राच्या जलसाठ्यात वाढ होण्याची शक्यता वाढल्याने नागरिकांनी नदी पात्रा जवळ जाणे टाळावे, नदी काठच्या गावांना तसेच नदी पात्रातुन आवागमन करणाऱ्या सर्व संबंधितांनी स्वतःची काळजी घ्यावी असा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. असे एन एस सावरकर उपविभागीय अभियंता, रंजीत दुसावार तहसिलदार, व्हि डी दुपारे पेंच पाटबंधारे विभाग अभियंता, सुरज शेडें तालुका कृर्षी अधिकारी, सुभाष जाधव पंचायत समिती बिडी ओ पारशिवनी यांनी सर्व संबंधित कर्मचारी यांना सुचना करून परिसरातील शेतकरी व नागरिकांना सावध राहण्याचे कडकडीचे आवाहन करून परिस्थितीवर लक्ष ठेवुन असल्याने बहुतेक कुठलिही जिवहानी झाली नाही. पाण्याचा येवा वाढल्यास परत पुन्हा धरणाचे दरवाजे उघडुन पाण्याचा विसर्ग नदीत कमी जास्त करण्यात येऊ शकतो करिता नदी काठावरील शेतकरी, नागरिकांनी सतर्कता बाळगुन दक्षता घ्यावी. असे प्रशासना व्दारे इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

धर्मराज विद्यालयातील खेळाडुंची राज्यस्तरीय स्पर्धेत निवड

Tue Sep 19 , 2023
धर्मराज विद्यालयातील खेळाडुंची राज्यस्तरीय स्पर्धेत निवड कन्हान,ता.१९     धर्मराज विद्यालयातील चेतन पाहुणे व तन्मय चरडे या दोन्ही विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. लातुर येथे राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.    राज्य क्रीडा विभागाच्या वतीने दरवर्षी शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी धर्मराज विद्यालय कन्हान […]

You May Like

Archives

Categories

Meta