लाभार्थ्यांना अनुदान ,साहित्याचे वाटप : सुनील केदार

 

लाभार्थ्यांना अनुदान ,साहित्याचे वाटप : मंत्री सुनील केदार

सावनेर : शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजूंना लवकरात लवकर मिळावा हीच प्रशासन व पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे . कामे मार्गी लावण्यासाठी प्रशासन व पदाधिकारी यांच्यात समन्वय महत्त्वाचा आहे . कोविडच्या काळातही सावनेर तालुक्यात स्थानिक पदाधिकारी व विविध विभागातील प्रशासन यांच्या समन्वयामुळे विविध योजनांचा लाभ ग्रामीण स्तरावरील गरजू व्यक्तींच्या घराघरात पोहोचत असल्याचे प्रतिपादन क्रीडा , पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी केले .

तहसील कार्यालयात महसूल विभाग व पंचायत समितीच्या वतीने शासनाच्या विविध योजनेतील गरजू लाभार्थ्यांना सहानुग्रह अनुदान व वस्तूंचे वाटप करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते . मंचावर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे , पंचायत समितीच्या सभापती अरुणा शिंदे , उपसभापती प्रकाश पराते , उपविभागीय अधिकारी अतुल मेहत्रे , तहसीलदार प्रताप वाघमारे , गटविकास अधिकारी अनिल नागणे , तालुका कृषी अधिकारी आश्विनी कोरे , नायब तहसीलदार चैताली दराडे , ज्योती शिरस्कर , प्रकाश खापरे , गोविंदा ठाकरे , ममता केसरे उपस्थित होते . यावेळी अतिवृष्टीमुळे व पूरग्रस्त नागरिकांच्या झालेल्या घरांची पडझड , जनावरांचे नुकसान व शेत पिकांचे नुकसानीसाठी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत काही पात्र लाभार्थ्यांना 20 हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले . पंचायत समितीमार्फत खनिज निधीअंतर्गत ग्रामीण भागातील काही गरजू दिव्यांगांना वाहन वाटप तसेच जिल्हा परिषद शेष फंडा अंतर्गत मनोरमा महाजन या महिलेला झेरॉक्स मशीन देण्यात आली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

आँनलाईन सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबीरस उत्सफुर्त प्रतिसाद

Sat Oct 17 , 2020
*आँनलाईन सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबीरस उत्सफुर्त प्रतिसाद* *महिला पतंजलि जिल्हा समीती नागपूर चा उपक्रम* *नागपूर सह महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगढ,बेंगलोर नोयेडा वरूण प्रशिक्षणार्थी सहभागी* सावनेर  : नागपूर महिला पतंजलि योग समिती व्दारे जिल्हा पतंजलि योग समीती व युवा भारत च्या सहकार्यांने सुरू असलेल्या आँनलाईन सहयोग शीक्षक प्रशिक्षण शीबीरस प्रशिक्षणार्थी तसेच पतंजलि […]

You May Like

Archives

Categories

Meta