कांन्द्री ग्रामपंचायत येथे क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

*कांन्द्री ग्रामपंचायत येथे क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची जयंती साजरी*

कन्हान – कांन्द्री ग्रामपंचायत कार्यालय येथे क्रांतीवीर महामानव बिरसा मुंडा यांच्या १४६ व्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली .


सोमवार दिनांक १५ नोव्हेंबर ला क्रांतीवीर महामानव बिरसा मुंडा यांच्या १४६ व्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन कांन्द्री ग्रामपंचायत येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.रश्मी श्यामकुमार बर्वे व सरपंच बळवंत पडोळे यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांचा जीवनावर प्रकाश टाकला . कार्यक्रमात उपस्थित सर्व सदस्यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत बिरसा मुंडा यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली . या प्रसंगी कांन्द्री ग्रामपंचायत सदस्य धनराज कारेमोरे , राहुल टेकाम , प्रकाश चाफले , बैशाखु जनबंधु , ग्रामपंचायत सदस्या दुर्गा सरोदे , वर्षा खडसे , राखी परते , अभय जांबूतकर , गणेश आकरे , ग्राम विकास अधिकारी दिनकर इंगळे सह आदि नागरिक उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

बिरसा मुंडा यांची जयंती थाटात साजरी ; कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन

Wed Nov 17 , 2021
*बिरसा मुंडा यांची जयंती थाटात साजरी* कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन कन्हान – कन्हान शहर विकास मंच द्वारे बिरसा मुंडा यांच्या १४६ व्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात उपस्थित जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta