*शहिदांना दिली श्रद्धांजली*

कन्हान – १६ डिसेंबर १९७१ मध्ये झालेल्या भारत – पाकिस्तान च्या युद्धात भारता ने ३,९०० वीर जवान शहिद करुन विजय पताका मिळवला होता . म्हणुन १६ डिसेंबर हा दिवस विजय दिवस म्हणुन संपुर्ण देशात साजरा केला जातो .
त्या अनुषंगाने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी गांधी चौक येथे शहिदांच्या प्रतिमेवर पुष्प अर्पित करुन युद्धात शहिद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित केली .
बुधवार १६ डिसेंबर विजय दिवस वर कन्हान शहर विकास मंच च्या वतीने गांधी चौक येथे युद्धात शहिद झालेल्या शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजलि कार्यक्रमाचे आयोजन करुन कन्हान पुलिस स्टेशन चे एपीआई अमित कुमार आतराम यांनी शहिदांच्या प्रतिमेवर हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात केली असता मंच सचिव प्रदीप बावने यांनी विजय दिवस वर मार्गदर्शन केले . कार्यक्रमात सर्व मंच पदाधिकारी यांनी शहिदांच्या प्रतिमे वर पुष्प अर्पित करुन १६ डिसेंबर १९७१ मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान च्या युद्धात शहिद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजलि देण्यात आली.
कार्यक्रमात कन्हान शहर विकास मंच चे अध्यक्ष प्रवीण गोडे , उपाध्यक्ष ॠषभ बावनकर , सचिव प्रदीप बावने , महासचिव संजय रंगारी , कन्हान पुलिस स्टेशन चे एपीआई अमित कुमार आतराम , कुशाल रामटेके , राहुल रंगारी , हरीओम प्रकाश नारायण , सुषमा मस्के , पौर्णिमा दुबे , वैशाली खंडार , सोनु खोब्रागडे , अक्षय फूले , मुकेश गंगराज , प्रकाश कुर्वे , प्रवीण माने , शाहरुख खान , शुभम मंदुरकर , आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .