शिक्षकांचे प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातून एकाचवेळी निवेदन

शिक्षकांचे प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातून एकाचवेळी निवेदन

कन्हान: प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघातर्फे राज्यभर एकाचवेळी तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री,शिक्षण मंत्री व ग्राम विकास मंत्र्यांना निवेदन सादर केले जाणार आहे.यानंतर पुढील टप्प्यात सर्व जिल्ह्य़ात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व त्यानंतर मुंबई येथे संघटनेतर्फे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
या आहेत मागण्या-
जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी.,शिक्षण सेवक पद्धत बंद करून,नियमित शिक्षकाची नेमणूक करावी तसेच कार्यरत शिक्षणसेवकांचे मानधन वाढवण्यात यावे ,नव्या शैक्षणिक धोरणातील शिक्षण व शिक्षक विरोधी तरतुदी वगळण्यात याव्यात.,सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करुन ,खंड दोन प्रकाशित करण्यात यावा.जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया तात्काळ सुरु करण्यात यावी.
शिक्षकांना १०,२०,३० वर्षानंतरची आश्वासित प्रगती योजना लागू करावी.संगणक परीक्षा उत्तीर्णतेला मुदतवाढ देण्यात यावी व वसुली थांबवण्यात यावी,पदवीधर शिक्षकांना सरसकट वेतनश्रेणी देण्यात यावी, शिक्षकांना रजारोखीकरणाचा लाभ देण्यात यावा,वस्तीशाळा शिक्षकांची मुळनियुक्ती पासून सेवा धरुन वरीष्ठश्रेणीचा लाभ द्यावा,शिक्षण विभागातील सर्व रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी.केंद्रप्रमुखांची१००% पदे पदोन्नतीने शिक्षकांतून भरण्यात यावी,निवासाची व्यवस्था होत नाही तो पर्यंत मुख्यालयी राहण्याची अट रद्द करावी.

शिक्षकांचे बरेच प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत.तीन लाभाची आश्वासीत प्रगती योजना ,रजा रोखीकरण यासारखे लाभ इतर कर्मचा-यांना देय असतांना शिक्षकांनाच मात्र वंचित ठेवण्यात आलेले आहे.या व इतर प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघातर्फे राज्यभर एकाचवेळी तहसीलदारामार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात येणार आहे.

धनराज बोडे,जिल्हाध्यक्ष,
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा नागपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

भिवापूर तालुक्यात "आपले सरकार सेवा प्रकल्प" , कोरोना काळात ठरला स्तुत्य उपक्रम

Sun Dec 19 , 2021
*भिवापूर तालुक्यात “आपले सरकार सेवा प्रकल्प” , कोरोना काळात ठरला स्तुत्य उपक्रम*  भिवापुर :   महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून प्रत्येक ग्राम पंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात आले होते . सदर प्रकल्प संपूर्ण पणे चालवण्याची जबाबदारी CSC कडे देण्यात आली होती . या केंद्रामधून ग्राम पंचायत स्तरावरील […]

You May Like

Archives

Categories

Meta